*पाचल कोंडवाडीतील कु. आकांक्षा प्रमोद तेलंग हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पाचल कोंडवाडीतील कु. आकांक्षा प्रमोद तेलंग हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*
*पाचल कोंडवाडीतील कु. आकांक्षा प्रमोद तेलंग हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील पाचल कोंडवाडी येथील कु. आकांक्षा प्रमोद तेलंग हीची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नियुक्ती झाली आहे. कु. आकांक्षा तेलंग हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नं 5 येथे झाले असून माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय पाचल येथे झाले असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तीने या यशाला गवसणी घातली आहे कु आकांक्षा हिची आई गृहिणी असून वडील खासगी कंपनीत नोकरी करतात एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आकांक्षाने लहानपणापासून पोलीस दलात भरती होण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगले होते त्यासाठी तीने अथक परिश्रम घेतले नियमित अभ्यास, कठोर परिश्रम आणि शारीरिक तयारीच्या जोरावर पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तीने मिळवलेल्या यशामुळे ती इतर युवतींना प्रेरणास्थान ठरली आहे सध्या ती वडीलांसोबत वर्तक नगर ठाणे येथे वास्तव्यास आहे. कु. आकांक्षा हिचे पाचल पंचक्रोशी सह राजापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.



