*बनावट दारु बनविणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकुण 1 लाख 52 हजार 304 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बनावट दारु बनविणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकुण 1 लाख 52 हजार 304 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
*बनावट दारु बनविणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकुण 1 लाख 52 हजार 304 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 23 मार्च 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धडगाव येथे धनाजे गावाचा कारभारीपाडा येथे एका कुडाच्या झोपडीच्या आडोशाला इसम नामे सुनिल हात्या पाडवी हा त्याचे कब्जात मानवी आरोग्यास अपायकारक अशा स्पिरीट द्रव्यापासुन बनावट देशी दारु विक्री करण्याचे उददेशाने तयार करीत आहे, अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले. मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे धडगाव पोलीस ठाण्याचे मदतीने धनाजे गावाचे कारभारीपाडा ता. धडगाव जि. नंदुरबार येथील एका कुडाच्या झोपडीच्या आडोश्याला जाऊन पाहता एक इसम त्याचे कब्जात काही खाकी रंगाचे बॉक्स, पांढऱ्या रंगाच्या गोण्या घेऊन बसलेला दिसला त्यास पोलीस आल्याची चाहुल लागली व त्याने सदर ठिकाणाहुन पळ काढला. सदर ठिकाणी पथकाने तपासणी करता मानवी आरोग्यास अपायकारक अशा स्पिरीट द्रव्यापासुन बनावट देशी दारु टैंगो पंच तयार करण्याचे साहित्य, स्पिरिट, व इतर असा एकुण 1,52, 304 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. त्याअन्वये आरोपीविरुध्द धडगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 123/2026 महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेकॉ/सजन वाघ, पोकों/यशोदिप ओगले यांनी केली आहे.



