*इकळीमाळ जि. प. प्रा. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयास आय एस ओ नामांकन प्राप्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*इकळीमाळ जि. प. प्रा. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयास आय एस ओ नामांकन प्राप्त*
*इकळीमाळ जि. प. प्रा. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयास आय एस ओ नामांकन प्राप्त*
नरसी(प्रतीनिधी):-येथून जवळच आसलेल्या इकळी (माळ) ता. नायगांव जि.नांदेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालयास शासनाच्या वतीने आय एस ओ नामांकन दर्जा प्राप्त झाला असून आज सोमवारी गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगांव आणि गटशिक्षण अधिकारी नायगांव यांच्या उपस्थितीत आयएसओ नामांकन प्रमाणपत्राचे वितरण शाळा व्यवस्थापन तसेच ग्रामपंचायत व्यवस्थापनाला देऊन गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, विस्तार अधिकारी प्रकाश जाधव, महेश मुखेडकर, मंगेश हनवटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील हा मानाचा आयएसओ मानांकन पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गणेश रणवीरकर आणि किरण ढवळीकर यांनी स्वीकारला तर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी विद्या मोरे तत्कालीन सरपंच रेखा कैलास सूर्यवंशी उपसरपंच चंद्रकला माधव गिरी यांनी स्वीकारला आहे.
गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आणि ग्रामपंचायत व्यवस्थापनाला आयएसओ नामांकन मिळविण्यासाठी तत्कालीन सरपंच रेखाताई कैलास सूर्यवंशी, उपसरपंच चंद्रकला माधव गिरी, ग्रामपंचायत अधिकारी विद्या मोरे, शंकर गिरी यांनी गावकरी मंडळीला सोबत घेवून मोलाचे परिश्रम घेतले त्यामुळेच हा मानाचा आयएसओ मानांकन पुरस्कार प्राप्त झाला असल्याची भावना उपस्थित मान्यवर मंडळींनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला नारायण पा. जाधव, मोहन देवघरे, परमेश्वर जाधव, गणेश करडे, दत्तराम करडे, बाबुराव पा. पुयड, चंद्रकांत पा. पुयड, गोविंदराव शिळे, संजय पा. पुयड सहशिक्षक माधव गायकवाड यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक मंडळी माता भगिनी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.



