*परमपूज्य संत दगा महाराज यांच्या दिंडीचे नंदनगरीत भव्य स्वागत ठिकठिकाणी केले पूजन व आरती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*परमपूज्य संत दगा महाराज यांच्या दिंडीचे नंदनगरीत भव्य स्वागत ठिकठिकाणी केले पूजन व आरती*
*परमपूज्य संत दगा महाराज यांच्या दिंडीचे नंदनगरीत भव्य स्वागत ठिकठिकाणी केले पूजन व आरती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-संत दगा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्ये जन्मस्थान चौपळा ते जलसमाधी स्थान आशा मां नर्मदा या मार्गावर दिंडी यात्रा दिनांक 23 मार्च रोजी चौपाळे येथून निघाली. आज 24 मार्च रोजी सकाळी नंदुरबार शहरात दिंडीचे आगमन झाले . या दिंडीत सुमारे दीड हजाराहून जास्त महिला पुरुष भाविक सहभागी झाले होते. हरी नामाचा गजर करीत संत दगा महाराज यांच्या जयघोष करीत दिंडीचे शहरात आगमन झाले आणि भव्य स्वागत ठीक ठिकाणी करण्यात आले. शहरातील मोठा मारुती मंदिरापासून प्रमुख मार्गावरून दिंडीचे परदेशीपुरा भागात पृथ्वीराज रघुवंशी यांच्या निवासस्थानी आगमन झाले. यावेळी पृथ्वीराज रघुवंशी, पुष्पेन्द्र रघुवंशी, सदानंद रघुवंशी, निखिल रघुवंशी, रघुवंशी, रुद्रप्रताप रघुवंशी यांच्यासह संपूर्ण परिवाराने सहकुटुंब पूजा करून आरती केली. तसेच नगरसेवक अमित रघुवंशी, राजेश रघुवंशी यांनी दिंडीत पूजा व आरती केली. संत दगा महाराज हे फार मोठे असे संत होऊन गेले. संत दगा महाराजांनी आयुष्यात कुठलाही लोभ न करता पैशाला देखील हात लावला नाही. अशा या चारित्र्य आणि लोभ नसलेल्या पूज्यनीय संत दगा महाराज यांना मानणारा मोठा वर्ग आजही आहे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दिंडी यात्रा काढण्यात येते. या दिंडीचे नेतृत्व महादेव चैतन्य बालब्रम्हचारी महाराज यांनी केले त्यानंतर त्यांचे मानसपुत्र खेतीया येथील संतोष चैतन्य महाराज हे नेतृत्व करीत आहेत. दिंडीचे 33 वे वर्ष आहे दिंडीत सुमारे दीड हजार भाविक सहभागी होतात महिला व पुरुष यांच्या समावेश आहे. राम नामाच्या गजर करीत दिंडी पदयात्रेने निघत असते ठीक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येते. दिंडीत सहभागी झालेले भाविकांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रत्येक गावात भाविक वाढत जात असतात. दिंडी चे स्वागत करण्यात येत असते. दिनांक
31 मार्च रोजी अशा नर्मदा येथे दिंडीचे आगमन होईल या ठिकाणी संत दगा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पादुकापूजनसह विविध कार्यक्रम होतील त्यानंतर या दिंडीच्या समारोप करण्यात येईल.
दिंडीसाठी पालखी समिती करण्यात आली असून काशिनाथ पाटील, भरत पाटील, ऋतिक पवार तसेच दिंडी आयोजन समितीचे उपाध्यक्ष रामजी जाधव, भटा पटेल, शरद पाटील, जंगलेश्वर राठोड यांच्यासह असंख्य भाविकांनी परिश्रम घेतले.



