*निपुण महाराष्ट्र अभियानामुळे विद्यार्थ्यांचा शिकण्याकडे वाढता कल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*निपुण महाराष्ट्र अभियानामुळे विद्यार्थ्यांचा शिकण्याकडे वाढता कल*
*निपुण महाराष्ट्र अभियानामुळे विद्यार्थ्यांचा शिकण्याकडे वाढता कल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील खांडबारा केंद्राची शिक्षण परिषद मोगी उन्नती संस्था संचलित माध्यमिक शाळा, खैरवे येथे उत्साहात संपन्न झाली. शिक्षण परिषदेची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. केंद्रप्रमुख प्रभू वळवी यांच्या शुभहस्ते पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी रमेश देसले व शिक्षण विस्तार अधिकारी शीलवंत वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी याहा मोगी उन्नती संस्था संचलित माध्यमिक शाळा खैरवे मुख्याध्यापिका सावित्री वळवी, केंद्रीय मुख्याध्यापिका रंजना वळवी, आंबाफळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल काकुस्ते, ज्येष्ठ शिक्षक परमसिंग नाईक तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी सीमा पाटील, प्रकाश रामोळे, विजय कोकणी, मिलिंद गावित, संदीप रामराजे, देवानंद वळवी, नम्रता चौधरी, सुरेश वळवी, रवींद्र गावित, स्वयंपाकीण शर्मिला गावित, अस्मिता गावित आदींनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन प्रभाकर चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अर्जुन बोरदे यांनी मानले. केंद्रस्तरीय गुणवत्ता आढावा बैठकीचा अहवाल सादर करण्यात आला. मागील शिक्षण परिषद व केंद्रस्तरीय गुणवत्ता आढावा बैठकीनिमित्त शाळास्तरावर पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शिक्षक व पालकांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केंद्रप्रमुख प्रभू वळवी यांनी मार्गदर्शनातून केले.
निपुण महाराष्ट्र – फेब्रुवारी 2026 अध्ययन स्तर विश्लेषण
याबाबत श्रीमती पुनम सिसोदे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचे विश्लेषण कसे करावे याबाबत सूचना दिल्या.
जयंत नारळीकर गणित-विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम
या उपक्रमासंदर्भात सुनिल सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करून गणित व विज्ञान विषय अधिक प्रभावीपणे शिकविण्यासाठी उपयुक्त सूचना दिल्या. SQAAF स्वयं-मूल्यांकन बाबत मार्गदर्शन
शाळेची गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असलेल्या SQAAF स्वयंमूल्यांकन प्रक्रियेबाबत अनिल काकुस्ते यांनी सविस्तर माहिती दिली. निपुण महाराष्ट्र – मार्च 2026 पूर्वतयारी व वर्ग नियोजन
माहे मार्च 2026 साठी पूर्वतयारी, वर्ग नियोजन व गटकार्य याबाबत नियोजनबद्ध अध्यापनाचे महत्त्व सांगितले. शिक्षण परिषदेमध्ये सर्व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवून शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी सकारात्मक चर्चा केली. यावेळी बोलताना गोपाल गावित यांनी सांगितले की, निपुण महाराष्ट्र अभियानामुळे विद्यार्थ्यांचा शिकण्याकडे कल वाढत असून वाचन, लेखन व गणित या मूलभूत कौशल्यांमध्ये लक्षणीय प्रगती होत आहे. शिक्षकांनी नियोजनबद्ध अध्यापन, गटकार्य, कृतीआधारित शिक्षण आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धती, अनुभव कथन व मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले.



