ताजा खबरे:
*बनावट दारु बनविणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकुण 1 लाख 52 हजार 304 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
*इकळीमाळ जि. प. प्रा. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयास आय एस ओ नामांकन प्राप्त*
*माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात, अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*वाठार येथील बस डेपोसाठी कडक उन्हाळ्यात प्रवाशांसाठी पाणपोई सप्रेम भेट*
*परमपूज्य संत दगा महाराज यांच्या दिंडीचे नंदनगरीत भव्य स्वागत ठिकठिकाणी केले पूजन व आरती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*यावल प्रकल्प कार्यक्षेत्रात बाल मैत्री पूर्ण आश्रम शाळा कार्यक्रम अंतर्गत, सी.पी. फोकल पर्सन प्रशिक्षण संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*यावल प्रकल्प कार्यक्षेत्रात बाल मैत्री पूर्ण आश्रम शाळा कार्यक्रम अंतर्गत, सी.पी. फोकल पर्सन प्रशिक्षण संपन्न*

  • Share:

*यावल प्रकल्प कार्यक्षेत्रात बाल मैत्री पूर्ण आश्रम शाळा कार्यक्रम अंतर्गत, सी.पी. फोकल पर्सन प्रशिक्षण संपन्न*
यावल(प्रतिनिधी):-23 मार्च 2026 रोजी यावल प्रकल्प कार्यक्षेत्रात बाल मैत्री पूर्ण आश्रम शाळा कार्यक्रम अंतर्गत सी.पी. फोकल पर्सन प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच 23 मार्च हा शहीद दिवस असल्याने यावेळी क्रांति सेनानी शहीद भगत सिंह, शहीद सुखदेव आणि शहीद राजगुरु यांच्या बलिदानाला उजळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास यावल प्रकल्प कार्यालयातर्फे शिक्षण विस्तार अधिकारी आर जे मुसळे आणि व्हि डी गायकवाड यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मुख्याध्यापक ए एस मंगळे यांनी भूषवले सोबतच कार्यक्रमाला मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रवीण खांडपासोळे  उपस्थित होते त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले महिला मंडळ कार्यक्रम प्रमुख डॉ. नरेंद्र पवार उपस्थित होते. सीपीफोकल पर्सन प्रशिक्षण हे   प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिण्यात आलेले होते. प्रशिक्षणाचे आयोजन शासकीय आश्रम शाळा पिंगळवाडे आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले.
प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातला अनुभव आणि प्रदीर्घ अभ्यास यामुळेप्रशिक्षक प्रवीण खांडपासोळे यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षण घेतले त्यांच्या या गोष्टीमुळे  सर्वच सीपी फोकल पर्सन हे पूर्णवेळ प्रशिक्षणाला मनापासून उपस्थित असल्याचे चित्र होते. प्रशिक्षणा दरम्यान वातावरण निर्मिती म्हणून एएसएम अरविंद खडसे आणि मनिषा बैसाणे यांनी गाणे व ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून सी पी फोकल पर्सन यांच्यात उत्साह निर्माण केला. प्रशिक्षणाच्या शेवटी शिक्षण विस्तार अधिकारी व्ही डी गायकवाड आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ए एस मंगळे यांनी प्रशिक्षणामध्ये सी पी फोकल पर्सन भूमिका आणि जबाबदारी, जे जे ऍक्ट आणि पोक्सो अॅक्ट याबाबत मत मांडताना सांगितले की बाल संरक्षणामध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अतिशय साध्या सोप्या आणि प्रत्यक्ष घडलेल्या उदाहरणा देऊन समजून सांगितल्याने ती सर्वांच्या लक्षात राहिल. तसेच संस्थेच्या एएसएम यांचे कार्यक्षेत्रातील कामाबद्दल हे समाधान व्यक्त केले.मुख्याध्यापक आर एस तायडे, शिक्षक मनोज पिंगळे, शिक्षक बी. एच. नांदुरे आणि स्त्री अधीक्षका श्रीमती टी. के. खुणे यांनी देखील प्रशिक्षणाबाबत सकारात्मक मत नोंदवून अशा प्रकारचे प्रशिक्षण शाळा स्तरावर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी झाले तर बाल संरक्षणाचे कार्य यशस्वीरित्या होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करत शाळा स्तरावर सुरू असलेला बाल मैत्री पूर्ण आश्रम शाळा कार्यक्रम शाळा वगैरे यांचे कार्य उत्कृष्ट असून सावित्रीबाई फुले महिला मंडळ च्या कामाबद्दल  समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थांचे एएसएम श्रीमती मनीषा बैसाणे, अरविंद खडसे, दिनेश कुमार पाटील, जयेश वाडीले आणि जितेंद्र कामाडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. सोबतच शासकीय आश्रम शाळा पिंगळवाडे येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील अनमोल सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जितेंद्र गुरव यांनी केले तर प्रस्तावना आणि आभार प्रकल्प समन्वयक विक्रम शिंदे यांनी मानले. यावेळी सावित्रीबाई फुले महिला मंडळ  जबाबदारीतील 17 शासकीय आश्रम शाळांचे प्रमुख पाहुणे, सीपी फोकल व एस एम आणि प्रमुख पाहुणे मिळून एकूण 45 व्यक्ती उपस्थिती होती.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बनावट दारु बनविणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकुण 1 लाख 52 हजार 304 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
March, 24 2026
*इकळीमाळ जि. प. प्रा. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयास आय एस ओ नामांकन प्राप्त*
March, 24 2026
*माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात, अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
March, 24 2026
*वाठार येथील बस डेपोसाठी कडक उन्हाळ्यात प्रवाशांसाठी पाणपोई सप्रेम भेट*
March, 24 2026
*परमपूज्य संत दगा महाराज यांच्या दिंडीचे नंदनगरीत भव्य स्वागत ठिकठिकाणी केले पूजन व आरती*
March, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज