*परेल येथील बाल गोपाळ मित्र मंडळातर्फे भव्य श्री रामनवमी उत्सव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*परेल येथील बाल गोपाळ मित्र मंडळातर्फे भव्य श्री रामनवमी उत्सव*
*परेल येथील बाल गोपाळ मित्र मंडळातर्फे भव्य श्री रामनवमी उत्सव*
मुंबई(प्रतिनिधी):-बाल गोपाळ मित्र मंडळ चंडिका कंपाऊंड काळेवाडी परेल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवार दि 19 ते 26 मार्च 2026 या कालावधीत भव्य श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे. 19 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी हा.भ.प. ज्ञानोबा सरफळे महाराज व ह.भ.प. श्री दत्ताराम काशिक महाराज यांच्या नेतृत्वाखाली पहाटे 5 वा.काकड आरती व स. 9 वा. गुढी उभारण्यात येणार आहे. दु. 3 वा. हळदीकुंकू समारंभ, शनिवार दि.31 मार्च रोजी स. 8 ते 12 या वेळेत मोफत आरोग्य शिबीर, सायं 5 ते 7 विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, रविवार 22 मार्च रोजी स.8 ते 2 रक्तदान शिबिर, दु. 3 वा. श्री सत्यनारायण महापूजा, गुरुवार दि 26 मार्च 2826 रोजी स.10 ते 1 वा. श्रीराम जन्मोत्सव व किर्तन, दु.1 ते 3 महाप्रसाद, सायं 4 वा श्रीरामाच्या पालखीची भव्य मिरवणूक, रात्री 8 ते 10 या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे तसेच मंगळवार, बुधवार दि. 24, 25 रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत किर्तन व गुरुवार दि.26 रोजी स.10 ते 12 आणि रात्री 8 ते 10 या वेळेत किर्तन होईल दररोज सायं 6 ते 7.30 हरिपाठ होणार आहे या कार्यक्रमाला भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन रामजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



