*राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिवपदी रविंद्र वळवी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिवपदी रविंद्र वळवी*
*राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिवपदी रविंद्र वळवी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिवपदी रविंद्र वळवी यांची नियुक्ती. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्ह्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे, नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा यांची फेरनिवड करण्यात आली तर सचिव पदी रवींद्र वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नुकतेच शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, राष्ट्रीय सचिव रमेश देसाई, प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सुलभा पवार यांच्या संमतीने नंदुरबार जिल्ह्याची जम्बो कार्यकारणी गठीत करण्यात आली. यावेळी राज्यभरातील विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्याची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा, सचिव रवींद्र वळवी, कार्याध्यक्ष प्रभू तडवी, जिल्हा संपर्कप्रमुख गंगाराम वसावे, उत्तर महाराष्ट्र संघटक प्रमुख डॉ. जसपाल वळवी, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अनिल जावरे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन चौधरी, रमेश पाटील, प्रशांत राजपूत, जिल्हा सहसंपर्कप्रमुख तुषार नाईक, रमेश आर. पाटील, जिल्हा सहसचिव हेमंत परदेशी, दीपक गोसावी, जिल्हा सल्लागार ॲड. अमरसिंग वसावे, ॲड. रूपसिंग वसावे, तर जिल्हा सदस्य म्हणून आनंदराव पवार, वेस्ता पाडवी, विजय वळवी, जितेंद्र हिरे, विजय दगडू पवार, मंगेश पाटील,धडगाव तालुकाध्यक्ष मंगेश वळवी, शहादा तालुकाध्यक्ष पुलायन जाधव, शहादा तालुका उपाध्यक्ष दीपक गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी अभिनंदन केले.



