*रिक्षा चालकांवर आकसापोटी कारवाई नको-मंत्री प्रताप सरनाईक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रिक्षा चालकांवर आकसापोटी कारवाई नको-मंत्री प्रताप सरनाईक*
*रिक्षा चालकांवर आकसापोटी कारवाई नको-मंत्री प्रताप सरनाईक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-उपप्रादेशिक परिवहन विभागाने आकसभावनेतून रिक्षा चालकांवर कारवाई करू नये असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
नंदुरबार शहरात रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळाने आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे कैफियत मांडली. त्यानंतर आ.रघुवंशींनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत रिक्षा चालकांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली. मंत्री सरनाईक यांनी देखील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना रिक्षा चालकांवर कुठल्याही आकसापोटी कारवाई न करण्याच्या सूचना केल्या.



