*उमरी ते शिर्डी पदयात्रेचे नांदेड मध्ये उत्स्फूर्त स्वागत,महापौर कविता मुळे यांच्या हस्ते पालखी पूजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उमरी ते शिर्डी पदयात्रेचे नांदेड मध्ये उत्स्फूर्त स्वागत,महापौर कविता मुळे यांच्या हस्ते पालखी पूजन*
*उमरी ते शिर्डी पदयात्रेचे नांदेड मध्ये उत्स्फूर्त स्वागत,महापौर कविता मुळे यांच्या हस्ते पालखी पूजन*
नांदेड(प्रतिनिधी):-रामनवमी निम्मित काढण्यात आलेल्या उमरी ते शिर्डी पदयात्रेचे नांदेड मध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महापौर कविता मुळे यांच्या हस्ते सहयोगनगर चौकात पालखी पूजन करण्यात आले. तरोड्यात चांदोजी मंगल कार्यालयात मुक्काम करून यात्रा आज सकाळी निळा मार्गे वसमत कडे रवाना होणार आहे. रामनवमी उत्सव निमित्त श्री संत कवी दासगणू महाराज साई भक्त मंडळ उमरी (गोरठे) यांच्या वतीने उमरी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. यात्रेचे शिवाजी नगर येथील हनुमान मंदिरात आगमन झाले. पुष्वृष्टी व फटाक्याची आतषबाजी करून स्वागत झाले. साई भक्त दिलीप कंदकुर्ते व नगरसेवक कविता नागनाथ गड्डम, पंढरीनाथ बोकारे, सुहास लहानकर यांच्या वतीने आरती करन्यात आली. सायं यात्रेचे सहयोगनगर (राज कॉर्नर) गणपती मंदिर येथे नानक साई फाऊंडेशन तर्फे यात्रेचे पुष्प वृष्टी करून स्वागत झाले. महापौर सौ कविता संतोष मुळे, माजी महापौर सौ जयश्री निलेश पावडे, मनपा गटनेते ॲड. महेश कनकदंडे, माजी उपमहापौर उमेश पवळे, नगरसेवक साहेबराव गायकवाड, सदाशिव पुरी, कृष्णा देशमुख गोरठेकर यांची स्वागताला प्रमुख उपस्थिती होती. यात्रेचे संयोजक अशोक मामीडवार, गोपाळ राठोड यांचा सत्कार करण्यात आला. स्वागताला नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, सुभाष बल्लेवार, डॉ गजानन देवकर, सौ प्रफुल्ला बोकारे, सौ अश्विनी देशमुख, पुष्पा कोकीळ, धनंजय उमरीकर, गंगाधर पांचाळ, चंद्रकांत पवार, दिलीप देशमुख तरोडेकर, सुहास लहानकर हे उपस्थित होते.



