*15 दिवसांत शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यास सेलिब्रेटिंसह इतर सर्व टॉवर कायमस्वरूपी बंद करणार, शेतकरी व कामगार संघर्ष समितीचा इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*15 दिवसांत शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यास सेलिब्रेटिंसह इतर सर्व टॉवर कायमस्वरूपी बंद करणार, शेतकरी व कामगार संघर्ष समितीचा इशारा*
*15 दिवसांत शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यास सेलिब्रेटिंसह इतर सर्व टॉवर कायमस्वरूपी बंद करणार, शेतकरी व कामगार संघर्ष समितीचा इशारा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील पुर्व भागातील आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या सर्व जमीनी 36 व 36अ च्या आहेत. या शेतकऱ्याच्या
शेतावर सुझलान कंपनीने कोणत्याच प्रकारचा मोबदला न देता अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण काढून टाकावे किंवा रेडीरेकर दराने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज असंख्य शेतकरी यांनी तिलाली शनिमांडळ येथील सुझलान कंपनीच्या सीएमएस ऑफिसवर धडक देऊन टावर बंद आंदोलन केले. तहसीलदार नंदुरबार यांनी दिनांक 24 जून 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत सुजलोन कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश केलेते. तहसीलदार यांच्या आदेशाला सहा महिन्याच्यावर कालावधी लोटला आहे व हे आदेश पाळणे कंपनीला बंधनकारक असताना कंपनीने शेतकऱ्यांना अंधारात ठेवत कोणताच प्रकारचा मोबदला दिला नाही. म्हणून शेतकऱ्यांनी आज शनिमांडळ येथील सुजलोनच्या सीएमएस ऑफिसवर धडक देत टावर बंद आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत सुझलान कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हितेश बडगुजर व अमित यादव यांनी शेतकरी व संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 दिवसांत शेतकऱ्यांनाच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनानंतर समिती व शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले परंतु पंधरा दिवसात न्याय मिळाला नाही तर सेलिब्रिटींच्या टावर सहित इतर संपूर्ण परिसरातील टावर कायम स्वरुपी बंद करण्याचे समिती व शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. या आंदोलनात समितीच्या वतीने अध्यक्ष अरुण रामराजे, सचिव भिला दौलत भील, बापु भील, तानु भील, भिमराव सामुद्रे, अंबर ठाकरे, बळीराम भील, हिरामण भील, संजय भील, फुलाबाई भील, सनया भील, केवा अर्जून भील, चिल्या इमल्या भील इ उपस्थित होते. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे याच्या मार्गदर्शनात पोलीस ठाण्याचे राजन गावीत, श्रीकांत पाटील यांनी बंदोबस्त ठेवत चर्चा घडवून आणली.



