*लायन्स फेमिना क्लब मार्फत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लायन्स फेमिना क्लब मार्फत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*लायन्स फेमिना क्लब मार्फत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त district 3234H2 तसेच लायन्स फेमिना व लायन्स क्लब यांच्या वतीने वूमन सिम्पोजियम शक्ती उत्सव या रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असून महिला दिनाची ही एक मेजवानी आहे. यासाठी उपस्थितीचे आवाहन या प्रोजेक्टच्या प्रमुख पीनल शहा यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आठ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात अहमदाबाद येथून मोटिवेशनल स्पीकर डॉ हार्दि लुहार यांचे मोटिवेशनल स्पीच होणार असून जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांच्या सन्मान करण्यात येणार आहे. यासोबत मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात लायन्सचे प्रांतपाल पीएमजेएफ अश्विनकुमार बाजोरिया तसेच माजी प्रांतपाल पीएमजेएफ गिरीश सिसोदिया रिजन चेअरपर्सनला चेतन बरडिया तसेच झोनचेअर पर्सन
सतीश चौधरी पीएमजेएफ
सुप्रिया कोतवाल जीएसटी कॉर्डिनेटर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित क्लबच्या महिलांसह शहरातील महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पिनल शाह, डॉ शिरीष शिंदे, रंजना बोरसे यांनी केले आहे.



