*नंदुरबार येथे ज्येष्ठांचा होलिकोस्ताव साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे ज्येष्ठांचा होलिकोस्ताव साजरा*
*ज्येष्ठांच्या होलिकोत्सव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थातर्फे काल होलिकोत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव चौधरी होते. सर्व प्रथम साने गुरुजींची प्रार्थना 'खरा तो एकची धर्म' सामुहिक रितीने म्हटली गेली. नंतर जे सभासद मरण पावले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष अशोक टेंभेकर यांनी होळी बद्दल माहिती सांगितली. नंतर खालील सभासदांनी कार्यक्रमात भाग घेउन, कोणी भजन म्हटले कोणी गाणे गाऊन दाखवले कोणी कविता वाचून दाखवल्या तर कोणी विनोदी किस्से तर कोणी सर्वांना थोडासा रंग लावण्यात आला.
श्रीमती देव कन्या ताई सोनार, गीता पंडित, मंगला शिंपी, प्रा. ज्योती महंत, राजपूत सर, दरबार सिंग गिरासे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंपी आणी वसंतराव चौधरी. यांनी भाग घेतला. सुरेश जैन यांची संस्थेच्या सल्लागार समितीत निवड झाल्याबद्दल अध्यक्षांनी त्यांच्या पुष्पगुच्छ देउन सत्कार केला. अश्या रितीने खुप छान कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव राधेश्याम सोनार यांनी सर्वांचे आभार मानले.
सभेत सर्वश्री राजाराम निकम, दत्तात्रय शिंपी, अनिल चौधरी, देविदास वसईकर, भास्कर मराठे, डाॅ. लालचंदानी, लेखराज नानकानी रविंद्र रघुवंशी, डाॅ. उपेंद्र शहा, ॲड. श्रीराम सोनार, प्रमोद चौधरी, तसेच महीला कार्यकारिणी सदस्या सौ. रंजना शिंपी, सौ. प्रतिभा माळी, सौ
सुलोचना सोनार वगैरे सभासद बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.



