*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित यांची प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित यांची प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस*
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित यांची प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस*
नंदुरबार(प्रतिनिधी):-व्यस्त व नियोजित कार्यक्रमातून वेळ काढून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुंबईतील रिलायन्स समूहाच्या रुग्णालयात जाऊन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रति सद्भावना आणि सदिच्छा व्यक्त केल्याबद्दल डॉक्टर सौ. कुमुदिनी विजयकुमार गावित यांनी कुटुंबातर्फे आभार व्यक्त केले आहेत. काही आठवड्यापूर्वी हृदयविकारामुळे माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना नासिक येथील किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले होते. बायपास सर्जरी नंतर प्रकृती सुधारली होती. परंतु पुन्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबई येथील रिलायन्स समुहाच्या रुग्णालयात हलवणे भाग पडले होते. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 4 मार्च 2026 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट दिली. प्रत्यक्ष भेटून त्यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपचार व्यवस्थेची माहिती.