*एकतेचा संदेश, मस्जिद युनूसच्या वतीने अॅड कासिम वसीम बाबूसेठ कार्यालयात इफ्तार समारंभाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकतेचा संदेश, मस्जिद युनूसच्या वतीने अॅड कासिम वसीम बाबूसेठ कार्यालयात इफ्तार समारंभाचे आयोजन*
*एकतेचा संदेश, मस्जिद युनूसच्या वतीने अॅड कासिम वसीम बाबूसेठ कार्यालयात इफ्तार समारंभाचे आयोजन*
नांदेड(प्रतिनिधी):-पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने नांदेड येथील मस्जिद युनूसच्या व्यवस्थापनाने रेल्वे स्टेशनवरील अॅड कासिम वसीम बाबू सेठ कार्यालयात इफ्तार समारंभाचे आयोजन करून एकतेचा संदेश देण्याचे उत्तम काम केले. उपवास सोडण्याच्या (रोज़ा इफ्तार) समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे नांदेडमधील सर्व धार्मिक समुदायांचे धार्मिक नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मौलाना साद साहिब नदवी, मुफ्ती अयुब साहिब कासमी, मुफ्ती अब्दुल रज्जाक साहिब, भिकू संघाचे अध्यक्ष पय्याबोधी भंते जी, मेथोडिस्ट चर्च डीएस रेव्हरंड प्रशांत चांदुरीकर, रेव्हरंड मुसापाल सर, गुरुद्वारा बोर्डाचे माजी अधीक्षक रणजित सिंह चिरागिया, नानक साई फाऊंडेशनचे संस्थापक पंढरीनाथ बोकारे, मायकल जगदाळे, बालगीर महाराज, शहर पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वेन्जाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडराय, वझिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, सहाय्यक आयुक्त मिर्झा फरहतुल्लाह बेग, मुख्य उद्यान अधीक्षक, झोनल अधिकारी गौतम कवडे, अॅड मुहम्मद कासिम, अॅड मुहम्मद युनूस अवेज, अॅड तल्हा, ह्यूमन राइट्स एंड पीस आर्गेनाईजेशन के डायरेक्टर नईम खान सलीम खान, हॅपी क्लबचे अध्यक्ष मुहम्मद शोएब, अयुब खान पठाण, मनन बेग,सिमोन नागोरे उपस्थित होते.



