*आदिवासी बांधवांचा पवित्र होलीकोत्सव सातपुड्यात 26 फेब्रुवारी रोजी रोजी प्रथम मानाची मोरी- राही (डाब)देवाची होळी पेटवून होलिकोऊत्त्सव सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी बांधवांचा पवित्र होलीकोत्सव सातपुड्यात 26 फेब्रुवारी रोजी रोजी प्रथम मानाची मोरी- राही (डाब)देवाची होळी पेटवून होलिकोऊत्त्सव सुरुवात*
*आदिवासी बांधवांचा पवित्र होलीकोत्सव सातपुड्यात 26 फेब्रुवारी रोजी रोजी प्रथम मानाची मोरी- राही (डाब)देवाची होळी पेटवून होलिकोऊत्त्सव सुरुवात*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-आदिवासी बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा व पवित्र मानला जाणारा होलीकोत्सव सातपुड्यात उद्या दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रथम मानाची असलेली मोरी- राही येथिल (डाब) देवाची होळी पेटवून या होलीकोतवाला उत्साहात सुरुवात होत असून सातपुड्यातील काठी येथील प्रसिद्ध राजवाडी होळी 2 मार्च 2026 रोजी साजरी केली जाणार असून त्यानंतर सातपुड्यातील गावागावातील होलीकोत्सव साजरा केला जाणार आहे. होली कोतवाच्या सुरुवातीने सातपुड्यात चैतन्य निर्माण होऊन ढोल व डफ -घुंगरूंचा निनादासह मंजुळा आवाजातील होळी गीतांचे स्वर सातपुड्यात घुमू लागतील. सातपुड्यातील अबाल वृद्ध गेल्या अनेक दिवसांपासून उरत करीत प्रतिक्षेत असलेल्या होलिकोत्सवाला दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी मोरी -राही (डाब) प्रथम मानाची ' देव होळी ' रात्रभर होळी भोवती पारंपारिक वेशभूषित नृत्य करीत पहाटेच्या सुमारास होळी पेटवून या होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे, सर्वप्रथम राजा फांटा - गांडा ठाकूर यांनी या ठिकाणी होळी साजरी केली होती. ही देवाची होळी पेटविण्याचा पारंपारिक मान सातपुड्यातील डाब्या डावर परिवाराला देण्यात आल्याने या परिवाराचे वंशज धनसिंग रूपसिंग वसावे यांना ही होळी पेटवली यावेळी सरपंच आकाश वसावेसह गावातील प्रमुख पुजाऱ्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या होळी नंतर सातपुड्यातील काठी येथिल संस्थानिकांची प्रसिद्ध असलेली ' राजवाडी होळी ' दिनांक 2 मार्च 2026 रोजी साजरी केली जाणार असून या होळीनंतर सातपुड्यातील गावागावात होलिकोत्सव साजरा होणार आहे. अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील गावांमध्ये दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी डाब, पानबारी, तोडीकुंड, काकरपाटी, मोख, मनवाणी, खडकला, केल्ला, मोजरा. 28 फेब्रुवारी 2026 रोजी केवडी, रमसुला, गोऱ्या, मोखाडा, पाडली, खुंटामोडी, पांढरामाती, मांडवी खुर्द दिनांक 1 मार्च 2026 रोजी कालीबेल, ओहवा, उर्मिला माळ, वेली, अस्तंबा, उमरागव्हाण, सरी, वावी, दिनांक 2 मार्च 2026 रोजी काठी येथील प्रसिद्ध राजवाडी होळी, कुवा, गदवाणी, सिसा, सुरवाणी, पाडामुंड, भगदरी, काकरदा, मांडवी बुद्रुक दि.3 मार्च 2026 रोजी मोलगी, तलाई, खर्डा, सल्लीबार, जुने धडगाव, नंदलवड, जांगठी दि. 4 मार्च 2026 रोजी जामली, मोगरा, राजबर्डी, सोमाना, रोशमाळ दिनांक 5 मार्च 2026 रोजी जमाना, वरखेडी, तसेच धनाजे येथील राजवाडी होळी, साकलीउमर, दि. 6 मार्च 2026 रोजी सातपुड्यातील होलिकोत्सवाची सांगता धडगाव तालुक्यातील भोगवाडे येथील राजवाडी होळी साजरी होऊन मेलादा, भोंगर्या बाजार भरविण्यात येणार आहे. सातपुड्यामध्ये होलीका उत्सव परंपरेने मनोभावे व्रत करून नवस बोलून मोठ्या भावनेने उत्साहात साजरा केला जातो होळीला (ओली याहा) देवीचे स्थान असून सर्वप्रथम सातपुड्यात आदिवासी संस्कृतीत देव मानल्या जाणाऱ्या देवांनी होलीका उत्सव सुरू केल्याने सातपुड्यात या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे अबाल वृद्ध या उत्सवात मनोभावे सहभागी होतो.



