*महेन्द्र पब्लिक स्कूलमध्ये सिनियर के.जीच्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ दिमाखात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महेन्द्र पब्लिक स्कूलमध्ये सिनियर के.जीच्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ दिमाखात संपन्न*
*महेन्द्र पब्लिक स्कूलमध्ये सिनियर के.जीच्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ दिमाखात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महेन्द्र पब्लिक स्कूलमध्ये रविवारी सिनियर के.जीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ अत्यंत उत्साह, आनंद आणि भावनिक वातावरणात दिमाखात पार पडला. कार्यक्रमाला हस्ती पब्लिक स्कूल व हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन, हस्ती पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती शीतल जैन, नगरसेविका श्रीमती सायली रघुवंशी, निझर येथील बाबुराव पाटील, शाळेच्या संचालिका पिनल शाह, प्राचार्य अरुण पाटील, पीटीए अध्यक्ष जयेश जैन आणि पीटीए सदस्य ज्योत्स्ना बांगड मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने मंगलमय झाली. यानंतर सिनियर केजीच्या चिमुकल्यांनी रंगतदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. देविता पटेल व क्रियान बांगड यांनी निरागस शब्दांत आपले शाळेतील अनुभव बोलून दाखवले. संचालिका पिनल शाह यांनी पालकांसाठी विशेष मेडिटेशन सत्र आयोजित केले. या सत्रातून पालकांना आपल्या मुलांच्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचा अनोखा अनुभव मिळाला. या क्षणी संपूर्ण पालकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. यानंतर विद्यार्थ्यांनी पुस्तक का यावर आधारित प्रेरणादायी सुविचारांचे पठण केले आणि वाचनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे कैलास जैन यांनी शाळेतील शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कौतुक करत पालकांना मुलांवर योग्य संस्कार हीच भविष्याची खरी संपत्ती आहे असा संदेश दिला. कार्यक्रमाचे देखणे सूत्रसंचालन शिक्षक खगेन्द्र कदमबांडे यांनी केले. समारंभ यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून परिश्रम घेतले.



