*जी टी पाटील महाविद्यालयात एनएसएस व विद्यार्थी विकास विभाग कडून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत नशा मुक्तीची शपथ उपक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी टी पाटील महाविद्यालयात एनएसएस व विद्यार्थी विकास विभाग कडून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत नशा मुक्तीची शपथ उपक्रम संपन्न*
*जी टी पाटील महाविद्यालयात एनएसएस व विद्यार्थी विकास विभाग कडून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत नशा मुक्तीची शपथ उपक्रम संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-जी टी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि विद्यार्थी विकास विभाग कडून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत नशा मुक्तीची शपथ विषयक उपक्रम घेण्यात आला. या प्रसंगी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य प्रा. डॉ एम जे रघुवंशी यांनी अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कुटुंब, समाज आणि स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करण्याऱ्या व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे आवाहन करत नशामुक्त भारत घडवण्यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी, असे स्पष्ट केले. या प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा सुलतान पवार यांनी नशामुक्ती विषयक शपथ प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी कार्यक्रम अधिकारी प्रा जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ माधव वाघमारे यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ संदिप पाटील, रासेयो विभागीय समन्वयक डॉ दिनेश देवरे, प्रा डी डी गिरासे, प्रा एस बी वायसे, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ रूपेश देवरे, एनसीसी प्रमुख डॉ विजय चौधरी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक, विद्यार्थी उपस्थित होते.