*तीर्थक्षेत्र असगणी गावातील 5000 वर्षापूर्वीच्या पांडवकालीन श्री स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तीर्थक्षेत्र असगणी गावातील 5000 वर्षापूर्वीच्या पांडवकालीन श्री स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव संपन्न*
*तीर्थक्षेत्र असगणी गावातील 5000 वर्षापूर्वीच्या पांडवकालीन श्री स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव संपन्न*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-खेड तालुक्यातील असगणी गावातील 5000 वर्षापूर्वीच्या पांडवकालीन श्री स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. मंदिरच्या चारही बाजूला बारा महिने पाणी असते.मंदिरच्या बाजूला तलाव आहेत. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन पांडवकालीन मंदिर हीच असगणी गावची ओळख आहे. 2017 मध्ये असगणी गावचे सुपुत्र संदीप फडकले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. यंदाची 10 वी महाशिवरात्री आहे. या महाशिवरात्री उत्सवाला सकाळी 6 वाजल्या पासून रात्री 10 वाजेपर्यंत भाविक भक्त दर्शनासाठी येत होते. तसेच आय लव असगणी जय भोलेनाथ सेल्फी पॉइंटचे उद्घाटन एमएसीबीचे अधिकारी विजेंद्र मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाशिवरात्री उत्सवाला अनेक मान्यवर, ग्रामस्थ तसेच खेड तालुक्यातील असंख्य भाविक उपस्थित होते. दीपक माने (सरपंच लवेल),कृष्णा शेलार, वसंत मोरे (जल फाऊंडेशन सल्लागार), चंद्रकांत मोरे (जल फाऊंडेशन सदस्य), प्रकाश गोठल (चिंचवली) यांनी महाशिवरात्री उत्सवाला उपस्थिती दाखवली. मंदिर व्यवस्थापक संदीप फडकले, दादा वैद्य तसेच त्यांचे सहकारी अजय शिगवण, राजेंद्र धाडवे, अरुण फडकले, प्रभाकर नायनाक, राकेश पवार, रुपेश गोसावी, अनंत स. नायनाक, प्रमोद पवार, सचिन बाईत, किरण शिगवण, सुनील तुकाराम धाडवे, अशोक शिगवण, प्रदीप शिगवण, मंगेश विटले, सुजल फडकले आणि गावातील तरुण वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.



