*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे शिवाजी महाराज जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे शिवाजी महाराज जयंती साजरी*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे शिवाजी महाराज जयंती साजरी*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने
हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक उमेश पाटील होते. तर प्रमुख वक्ते विलास मगरे, व तुकाराम भील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते विलास मगरे यांनी सांगितले की शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने
रयतेचे राज्य सुरू केले. शेतकऱ्याच्या मालाला हात न लावण्याच्या सूचना
महाराजांनी आपल्या सैन्याला केल्या होत्या असे सांगितले. तसेच तुकाराम भील यांनी सांगितले. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करून आदर्श राज्यकारभार करण्यास प्राधान्य दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले की शिवाजी महाराज यांनी आपल्या सैन्यात विविध जातीधर्माचे शूरवीर मावळे घेऊन सामाजिक सलोखा निर्माण केला. तसेच त्यांनी अंधश्रध्देला कधीच वाव दिला नाही. त्यांनी जेवढ्याही गड, किल्ले जिंकले ते
अमावस्येच्या रात्रीच जिंकल्या
असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल साळुंखे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पंकज खेडकर यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संदीप मोरे, राजेंद्र ढोडरे, विलास पाडवी, सुदाम जंभोरे
तसेच संतोष राठोड, मोहन वळवी, सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



