*के. आर. पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*के. आर. पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-के आर पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती अश्विनी नंदकुमार भदाणे उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, उपाध्यक्ष सिध्दार्थ वाणी नंदूरबार शहराचे उद्योगपती अशोक शहा, शाळेचे सचिव सचिन शहा, प्राचार्य डॉ. छाया शर्मा व उपप्राचार्य इ. उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यानंतर मार्च पास करीत विद्यार्थ्यांनी आपल्या गटाची धुरा सांभाळून राष्टीय ध्वजला मान वदंना दिली व राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य तसेच भाषणांद्वारे आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार व देशभक्ती जोपासावी तसेच जबाबदार नागरिक म्हणून घडावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास शाळेची प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी आपल्या भाषणातून हुतात्म्याची आठवण करून दिली. शाळेचे चेअरमन किशोर वाणी, प्रजासत्ताक दिनाचे महत्व सर्वांना सांगितले. पालक व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



