*के आर पब्लिक स्कूल, येथे ‘मिशन IAS अंतर्गत- मी IAS होणार’ या विषयावर मार्गदर्शन सेमिनार संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के आर पब्लिक स्कूल, येथे ‘मिशन IAS अंतर्गत- मी IAS होणार’ या विषयावर मार्गदर्शन सेमिनार संपन्न*
*के आर पब्लिक स्कूल, येथे ‘मिशन IAS अंतर्गत- मी IAS होणार’ या विषयावर मार्गदर्शन सेमिनार संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कूल येथे आयोजित केलेल्या महात्मा फुले फाऊंडेशन अंतर्गत ‘मिशन मी IAS होणार’ या विषयावर मार्गदर्शन सेमिणार संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘मी IAS होणार’ या प्रेरणादायी विषयावर मार्गदर्शन सेमिणाराचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिणारात प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी विद्यार्थ्यांना IAS परीक्षेची तयारी, अभ्यासाची दिशा आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, संचालक अशोक शाह, उपाध्यक्ष सिध्दार्थ वाणी, नरेंद्र जाधव, शांतीलाल महाजन, मधुकर माळी, विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा उपस्थित होते. प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी IAS, IPS, IFS यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. “ग्रामीण आणि सामान्य पार्श्वभूमीतील विद्यार्थीही योग्य नियोजन व मेहनतीच्या जोरावर IAS होऊ शकतात,” असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना उच्च ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. नदीम शेख यांनी सुत्रसंचलन केले.



