*जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था, मराठा युवा मंच व नवजीवन व्यायाम शाळेतर्फे, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त, प्रतिमापुजनाचा कार्यक्रम उत्सवात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था, मराठा युवा मंच व नवजीवन व्यायाम शाळेतर्फे, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त, प्रतिमापुजनाचा कार्यक्रम उत्सवात संपन्न*
*जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था, मराठा युवा मंच व नवजीवन व्यायाम शाळेतर्फे, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त, प्रतिमापुजनाचा कार्यक्रम उत्सवात संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-येथील जिजामाता नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न झाली. बाहेरपुरा परीसरात 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन नवनिर्वाचित नगरसेवक राऊ मोरे, किरण रघुवंशी व नगरसेविका सौ. मनकुवर गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित नगरसेवक कुणाल वसावे, कैलास पाटील, प्रेम सोनार यांचा सत्कार करण्यात आला
तसेच उपस्थित मान्यवर प्राचार्य विजय बोराणे प्राचार्य संजय उगले हरीश हराळे मॅनेजर हस्ती बँक (गिरीविहार शाखा), जितेंद्र मराठे बालाजी पतसंस्था, मोहन मराठे, चेअरमन संत दगा महाराज पतसंस्था, अनिल वायकर तसेच प्रकाश हराळे आदी मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण मोरे, व्हा. चेअरमन कैलासचंद्र अग्रवाल व संचालक मंडळ तसेच मराठा युवा मंच व नवजीवन व्यायाम शाळेचे सभासद व कार्यकर्ते यांनी केले होते. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने परिसरातील बंधू व भगिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे कर्मचारी शैलेश शाह, भाईदास भदाणे, राहुल गायकवाड, सुरेश अहीरे यांनी प्रयत्न केले.