*मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत 24 सप्टेंबरपासून सुनावणी, मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणी प्रक्रियेत सहभागी व्हावे,उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत 24 सप्टेंबरपासून सुनावणी, मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणी प्रक्रियेत सहभागी व्हावे,उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे*
*मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत 24 सप्टेंबरपासून सुनावणी, मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणी प्रक्रियेत सहभागी व्हावे,उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये 24 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. मतदारांनी सुनावणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यातील मतदान केंद्रांच्या सुसूत्रिकरण व पुनर्रचनेची कार्यवाही पूर्ण झाली असून 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारुप मतदार याद्यांच्या अनुषंगाने 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026 हा कालावधी 'नोटिस टप्पा' म्हणून निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत ज्या मतदारांची नावे जुळवणी झाली नाहीत अथवा जुळवणी झाली असूनही तार्किक विसंगती आढळून आली आहे, अशा मतदारांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. संबंधित मतदारांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली कोणतीही एक वैध कागदपत्रे / दस्तऐवज सादर करणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये आधार कार्ड हे केवळ ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. विधानसभा मतदारसंघनिहाय सुनावणीचे वेळापत्रक व स्थळ, 01- अक्कलकुवा,
सुनावणी दिनांक, 28 सप्टेंबर, 2026 ते 29 ऑक्टोंबर, 2026, स्थळ
शहरी भागासाठी- तहसिल कार्यालय, अक्कलकुवा, पंचायत समिती, अक्कलकुवा, अप्पर तहसिल, मोलगी. ग्रामीण भागासाठी- ग्रामपंचायत कार्यालय व वाड्या- पाड्यावरील जिल्हा परिषद शाळा. अक्राणी,
सुनावणी 26 सप्टेंबर, 2026 ते 29 ऑक्टोंबर, 2026, स्थळ शहरी भागासाठी- तहसिल कार्यालय, अक्राणी, नगरपंचायत कार्यालय, अक्राणी, पंचायत समिती, अक्राणी;
ग्रामीण भागासाठी- ग्रामपंचायत कार्यालय व वाड्या-पाड्यावरील जिल्हा परिषद शाळा.02-शहादा, सुनावणी 26 सप्टेंबर, 2026 ते 29 ऑक्टोंबर, 2026, स्थळ,
शहरी भागासाठी- नगरपरिषद कार्यालय,शहादा.
ग्रामीण भागासाठी- ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळा. तळोदा, सुनावणी 28 सप्टेंबर, 2026 ते 29 ऑक्टोंबर, 2026 स्थळ
शहरी भागासाठी- तहसिल कार्यालय, तळोदा, नगरपालिका कार्यालय, तळोदा.
ग्रामीण भागासाठी- ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळा. 03 नंदुरबार, सुनावणी 24 सप्टेंबर, 2026 ते 29 ऑक्टोबर, 2026, स्थळ
शहरी भागासाठी- तहसिल कार्यालय, नंदुरबार, नगरपालिका कार्यालय, नंदुरबार, पंचायत समिती कार्यालय, नंदुरबार.
ग्रामीण भागासाठी- ग्रामपंचायत कार्यालय. 4- नवापूर, सुनावणी 26 सप्टेंबर, 2026 ते 29 ऑक्टोंबर, 2026, स्थळ शहरी भागासाठी- नगरपरिषद कार्यालय, नवापूर, पंचायत समिती कार्यालय, नवापूर.
ग्रामीण भागासाठी- ग्रामपंचायत कार्यालय. सर्व मतदारांनी या सुनावणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी केले आहे.



