*महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर*
*महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर*
मुंबई(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदार संघांसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपुष्टात येणार आहे. या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर, अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2026 आहे. मतदान 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होईल. मतमोजणी 27 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.महाराष्ट्रातील या पाच जागांमध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर या विद्यमान सदस्यांचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा केल्यापासून संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसह विधान परिषद निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू करण्याबाबत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही स्पष्टता देण्यात आली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.



