*पु.लं.चा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा संकल्प, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराला शासन निर्णयाचे बळ, पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित होणार,
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पु.लं.चा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा संकल्प, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराला शासन निर्णयाचे बळ, पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित होणार,
*पु.लं.चा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा संकल्प, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराला शासन निर्णयाचे बळ, पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित होणार, पुस्तक प्रकाशनासाठी 10 लाख रुपयांपर्यंतची प्रशासकीय मान्यता*
मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला समृद्ध करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या संकल्पाला आता शासन निर्णयाचे बळ मिळाले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकारातून
पु.ल.देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी होणाऱ्या खर्चास 10 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाने पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित करण्यास आणि त्यासाठी होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पु. ल. देशपांडे यांच्या जतन केलेल्या पत्रसंग्रहाचे शास्त्रशुद्ध संपादन व पुस्तक रूपाने प्रकाशन करण्याच्या प्रक्रियेला संस्थात्मक पाठबळ मिळाले आहे. पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांतून त्यांनी मराठी समाजाशी समृद्ध संवाद साधला. त्यांच्या पत्रव्यवहारात भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पं. रविशंकर, ग. दि. माडगूळकर, वि. वा. करंदीकर, जयवंत दळवी, विजय मर्चंट, बाबा आमटे, स्वामी विज्ञानानंद, पांडुरंगशास्त्री आठवले, दया पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. त्यामुळे हा पत्रव्यवहार केवळ वैयक्तिक संवाद नसून त्या काळातील साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतो.
पु.ल.देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी अनेक मान्यवरांची पत्रे जपून ठेवली होती. तसेच पु.लं.नी विविध मान्यवरांना लिहिलेल्या पत्रांच्या प्रतीही सुनीताबाई आणि कुटुंबीयांच्या संग्रहात उपलब्ध आहेत. या सांस्कृतिक ठेव्याचे पुस्तक रूपाने प्रकाशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानंतर या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रमाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयातून पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यिक योगदाना सोबतच त्यांच्या समकालीन व्यक्तिमत्त्वांशी असलेल्या संवादाचा ठेवा संशोधक, साहित्यप्रेमी आणि नव्या पिढीसाठी उपलब्ध होणार आहे.पु.ल.देशपांडे यांच्या साहित्याचा आणि त्यांच्या काळाचा सांस्कृतिक संदर्भ जतन करणारा हा पत्रसंग्रह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीचे दस्तऐवजीकरण करणारा महत्त्वपूर्ण ठेवा ठरणार आहे.



