*बामखेडा महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ जयंती साजरी*
*बामखेडा महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ जयंती साजरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी कल्याण, विभाग आणि इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने राजश्री जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विद्यार्थी विभाग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. करंके यांनी जयंती मागील हेतू आणि भूमिका स्पष्ट केली तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. वाय. सी. गावित होते यांनी जिजामाता यांच्या कार्याचा गौरव केला तसेच स्वामी विवेकानंदांनी केलेल्या कार्य आजच्या नवीन पिढीला किती प्रेरणादायक आहे या अनेक गोष्टींवर त्यांनी विविध उदाहरणातून आपले विचार प्रगट केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनीही जिजामाता यांचं कार्य आणि स्वामी विवेकानंदांचे कार्य किती महान होते आज या महान विचारांची आजच्या तरुण पिढीला किती गरज आहे. हे त्यांनी विविध उदाहरणातून स्पष्ट केले . या कार्यक्रमाचे आभार प्रकटन प्रा. एम. एस. निकुंभे यांनी केले यावेळी महाविद्यालयातील प्रा.ए. एम. गोसावी तसेच विज्ञान विभागातील प्राध्यापक बंधू- भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



