*उपनगर हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, एकूण 52 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने व कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उपनगर हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, एकूण 52 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने व कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत*
*उपनगर हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, एकूण 52 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने व कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-5 जानेवारी 2026 उपनगर पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं. 04/2026 भा. न्या. संहिता कलम 305(अ), 331(3) वगैरे गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, वरील नमुद गुन्हा हा एकता नगर परिसरातील इसम गुरुपाल शिकलीकर व त्याच्या साथीदार यांनी मिळून केला आहे, अशी खात्रिशीर बातमी मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच पथकास बातमीची खात्री करुन कारवाईकामी रवाना केले. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने एकता नगर परिसरात गुरुपाल शिकलीकर याचा शोध घेतला असता तो त्याच्या साथीदारासह मिळुन आला. त्यांना त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे गुरूपाल कप्तान शिकलीकर, वय 18 वर्षे, रा. एकता नगर, नंदुरबार, **** (विधीसंघर्षग्रस्त बालक), रा. एकता नगर, नंदुरबार असे सांगितले. त्यांना वरील नमुद घर फोडोचे गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हयाची हकिगत सांगत कबूली दिली. तसेच गुन्हयातील गेला मालाबाबत विचारणा करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना अधिकचे विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी घराचे बाहेरील असलेल्या बाथरुम मधील एका कप्यातुन बॅग काढून दिली. सदर बॅगेची पंचांसमक्ष पाहणी करता त्यामध्ये घरफोडीचे गुन्हयात चोरी केलेला एकुण 52 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये चांदीचे दागिने, कॅमेरा असे हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोहेकों/अजित गावीत, राकेश मोरे, पोकों/अभय राजपुत, रामेश्वर चव्हाण, सतीश घुले, आनंदा मराठे यांनी केली आहे.



