*दहिवेल चिंचपाडा, बोदगाव, मैदाणे, परिसरात दिवसा 7 ते 8 तास विजेचा वेळ वाढून मिळणेबाबत निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दहिवेल चिंचपाडा, बोदगाव, मैदाणे, परिसरात दिवसा 7 ते 8 तास विजेचा वेळ वाढून मिळणेबाबत निवेदन*
*दहिवेल चिंचपाडा, बोदगाव, मैदाणे, परिसरात दिवसा 7 ते 8 तास विजेचा वेळ वाढून मिळणेबाबत निवेदन*
साक्री (प्रतिनिधी):-कार्यकारी अभियंता / उपअभियंता
महावितरण कार्यालय यांना दहिवेल चिंचपाडा, बोदगाव, मैदाणे, परिसरात दिवसा 7 ते 8 तास विजेचा वेळ वाढून मिळणेबाबत निवेदन देण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील चिंचपाडा, बोदगाव, मैदाणे परिसरातील नागरिक यांना मागील गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत अनियमित, कमी दाबाची व वारंवार खंडित होणारी वीज पुरवठा सुरू आहे. तसेच रात्री लाईट असल्या कारणामुळे शेतकर्यांना जंगली प्राण्याचा (बिबट्या, वगेरे) वावर जास्त प्रमाणाता झाला असल्यामुळे वन्य प्राण्याचा मोठ्या प्रमाणात शेतकर्यावर प्राण घातक हल्ले होत आहेत. या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतकार्यांना पिकांच्या नुकसानीला सामोरे जात आहेत, विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीत, व्यापारी व लघुउद्योजक अडचणीत सापडले आहेत. मात्र वीज बिल मात्र वेळेवर व पूर्ण आकारले जात आहे, ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने परिसरातील ग्रामस्थांतर्फे ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. यावेळी निवेदनात नमूद करण्यात आल्या नुसार प्रमुख मागण्या परिसरात नियमित व दर्जेदार वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा, दिवसा 7/8 तास विजेचा वेळ वाढून मिळावा. रात्री बिबट्याच्या धाकामुळे शेतकरी रात्री शेतामध्ये जायला घाबरत आहे. त्यासंदर्भात कोंडाईबारी वन विभागाच्या संबंधित अधिकारी भालचंद्र कुवर यांना निवेदन दिले, सर्व मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, गणेश गावित, कांतीलाल भोये, देविदास गावित, युवराज चौरे, कैलास ठाकरे, सतीश चौरे, बापू गावित, राजेंद्र पवार, देविदास भोये, यांच्यासह मैद्याने, बोधगाव परिसरातील नागरिक यांनी दिला आहे.



