*शा.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शा.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा*
*शा.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शा.ज.नटावदकर विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी 2026 रोजी रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा विभाग प्रमुख मोनिका नेरे, रंजीता वसावे, कविता ठाकरे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. या स्पर्धेचे परीक्षण मोठा गट- एकलव्य विद्यालयाच्या शिक्षिका वर्षा घासकडवी, मीनल वसावे, सुवर्णा गिरासे मराठी केले. तसेच लहान गटाचे परीक्षण - बालमंदिरच्या मुख्याध्यापिका रंजना जोशी व मिताली अर्थेकर यांनी केले. रांगोळी स्पर्धेसाठी खालील विषय देण्यात आले होते. साक्षरता, नारी शक्ती, पाणीबचत (जल ही जीवन है), विविधता मे एकता, रक्तदान श्रेष्ठ दान स्पर्धेत एकूण 55 रांगोळ्या होत्या. रांगोळी स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. मोठा गट
प्रथम क्रमांक रसिका स्वप्नील सोनार, आणि ग्रुप इयत्ता 4 थी अ
द्वितीय क्रमांक सोमेश्वरी शिरसाठ, आणि ग्रुप इयत्ता 4 थी ड
तृतीय क्रमांक वेदांशी जाधव, आणि ग्रुप इयत्ता 3 री ड उत्तेजनार्थ निधी भावसार, आणि ग्रुप इयत्ता 3 री ड, लहान गट
प्रथम क्रमांक श्रेया प्रकाश भिसे आणि ग्रुप इयत्ता 1 ली ब,
द्वितीय क्रमांक साहिल सुनिल पाडवी आणि ग्रुप इयत्ता 2 री अ,
तृतीय क्रमांक केशवी पाटील आणि ग्रुप इयत्ता 2 री क,
उत्तेजनार्थ राधा अजय पाडवी आणि ग्रुप इयत्ता 2 री ब, यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



