*सन्मार्गाचे वस्त्र देणारा निर्वस्र संत निष्काम तपोमूर्ती प.पु. विश्ववंद्य अभिनंदनसागर महामुनीश्री*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सन्मार्गाचे वस्त्र देणारा निर्वस्र संत निष्काम तपोमूर्ती प.पु. विश्ववंद्य अभिनंदनसागर महामुनीश्री*
*सन्मार्गाचे वस्त्र देणारा निर्वस्र संत निष्काम तपोमूर्ती प.पु. विश्ववंद्य अभिनंदनसागर महामुनीश्री*
कुसुंबा(प्रतिनिधी):-आमच्या देशाची संस्कृती महान तशी इथली मातीही मोलाची आहे. हीच पावनभूमी साधुसंतांची सुवर्ण खाण आहे. यात शंकाच नाही ! अगदी पूर्वापार म्हणजे अति प्राचीन काळापासून भारताच्या भूमीत पुण्यवान आत्मे जन्म घेत आहेत ! इथल्या धर्मावर इथल्या संस्कृतीवर जेव्हा जेव्हा मरगळ पसरते तेव्हा तेव्हा ईश्वराचे प्रेषित देवदूत इथे अवतरतआपल्या जगावेगळ्या जगण्याने जगाला वेड लावतात ! अशाच एका सिद्धपुरुषाचे स्मरण करण्याची कुसुंबा धर्मनगरीत आगमनानिमित्त (नूतन वर्षात) आचार्य विद्यासागरजी महामुनींचेश्रींचे परमशिष्य प.पु. तपस्वी वृषभसागर महामुनीश्री तसेच प.पु. तपस्वी अभिनंदनसागर महामुनीश्री यांचा नवीन वर्षात खान्देशवाशीयांना दर्शनाचा लाभ मिळत असल्यामुळे नगरात नावीन्य चैतन्य वातावरण निर्मितीमुळे त्यांच्या त्यागी जीवनाचा आढावा घेण्याचा श्री 1008 कुंथुंनाथ दिगंबर जैन प्राचीन जैनअतिशय श्रेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा(धुळे) यांचा हा छोटासा प्रयत्न! इतिहासाची पाने अनेक युगांपासून संजवीली जात आहेत. या वीरांच्या भारतभुला सुरम्य उपवनाला अनेक नवरत्नांनी आपल्या कीर्तीच्या सुगंधाने दरवळून टाकले आहे. कोणी आपल्या रक्ताने इतिहास पृष्ठांवर त्यागाची गाथा लिहिली तर कोणी अद्भुत कीर्ती स्मारक बनवुन कीर्तीलाच स्थायं बनवण्याचा प्रयत्न केला. कोणी शरीरात थेंबा थेंबानी साठवलेले रक्त लोक कल्याणासाठी मुक्त हस्ताने खर्च केले. भारताच्या या सुपीक भूमीला जन्मकल्याणार्थ
आयुष्य समर्पित करणाऱ्यांची अखंड परंपरा लाभली आहे. युगसंतप.पु. वृषभसागर मुनिश्री प.पु.अभिनंदनसागर परंपरेचे सेतु आहेत. पुज्यश्रींच्या शब्दवाणीमध्ये कमालीचे माधुर्य आहे. त्यांच्या स्वभावात सरलता सात्विकता आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तपस्यांची त्यागाची चमक आहे. सर्व प्राणी मात्रांविषयी त्यांची सौजन्यवृत्, भुतदया वखाण्याजोगी आहे. मानवतेचे ते एक सुगंधी कुपी आहे. या दिव्यात्म्याचा मूळ उद्देश जन्ममृत्यूच्या अनादी बंधनांना तोडून टाकणे हा आहे. मुक्तीचे महान उद्दिष्ट प्राप्त करणे हा आहे. युग संतांचा मंगल विहार देशातील कोट्यावधी मानावांना धार्मिक, नैतिक, अध्यात्मिक मूल्यांचा मार्ग दाखवत आहेत. त्यांची अमृतवाणी देशात व्यापून राहिलेल्या राहिलेल्या अध्यात्मिक मूल्यांचा मार्ग दाखवत आहेत. त्यांची अमृतवाणी देशात व्यापून राहिलेल्या आध्यात्मिक केला नष्ट करण्याची क्षमता बाळगून आहेत. श्रमण संस्कृतीचे पूज्य अशा श्रमणाच्या रूपात ते पंच परमेष्टि पैकी एक आहेत. प.पु. मुनीश्रींची प्रवचन शैली इतकी सहज सुंदर व मनोहर आहे की ती सर्वांना भावते. त्यांच्या वाणीच्या रसात डुबुन ज्ञानी तसे अज्ञानी राजा तथा रंक, स्री, आणि पुरुष वृद्ध व तरुण देशी व परदेशी सगळेच ब्रह्मानंदांची प्राप्ती करतात. सरस्वतीच्या या महान पुत्राने आपल्या अद्वितीय साधनेने धार्मिक क्षेत्राला शाश्वत आणि किर्तिमान बनवले आहे. त्यांचे प्रवचन जेव्हा सुरू असते तेव्हा असे वाटते की ते कधी संपू नये चालूच राहावे. प्रवचनांची भाषाही सहजसोपी असते. जैन धर्मातील अत्यंत गुढअशी रहस्ये सहज समजावून सांगण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मुनीश्रींची प्रवचने म्हणजे पवित्र संदेश पूज्यश्री जिथे जातील तेथे पोहोचण्याआधीच त्यांच्या ज्ञानाची साधनेची व लोक कल्याणाच्या ध्यासाची कीर्ती जाऊन पोहोचते. त्यांच्या प्रवचन ज्ञानाच्या अथांग सागरातून ज्ञान माणसांना अधिक ज्ञान आणि भरकटलेल्यांना मार्ग सापडतो. व ध्येयाप्रत जातात. प.पु.मुनीश्रींच्या मार्गदर्शनरूपी जीवनाने ते भावविभोर होतात. पूज्यश्रींचे सध्या वास्तव्य कुसुंबा थर्मनगरीत असून यांचा संघाच्या नियमानुसार आगमन आणि मंगल विहार सुनिश्चित नसते. मुनीश्रींच्या दर्शनाचा, अमृतवाणीचा, आहार विधीचा अलभ्य लाभ केवळ त्या दिवसांपुरत (वास्तव्यपर्यंत) त्यांच व त्यांच्या कृतिशील तत्त्वांच पालन आणि स्मरण करून भागणार नाही. पुढे पूर्ण आयुष्यभर जर ती तत्व आणि मूल्य आपण सर्वांनी जाणीवपूर्वक अंगी बाळगली तर खऱ्या अर्थाने मानव जीवन सर्वांगीण भलं झाल्यापासून राहणार नाही.



