*जी.टी.पाटील महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी हे होते.
प्रारंभी डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवणारे असून स्त्री शिक्षण व सामाजिक समतेसाठी त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ. मनोज शेवाळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल व अभ्यासपूर्ण माहिती सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिनेश देवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप बडगुजर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. उपेंद्र धगधगे, प्रा.पी. सी.भील, प्रा. हर्षबोध बैसाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.



