*हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही शाहरुख खानला क्षमा नाही-हिंदु जनजागृती समिती
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही शाहरुख खानला क्षमा नाही-हिंदु जनजागृती समिती
*हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही शाहरुख खानला क्षमा नाही-हिंदु जनजागृती समिती*
नंदूरबार(प्रतिनिधी):-ज्याप्रमाणे पाकिस्तानसाेबत ‘पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही’, अशी भूमिका भारत सरकारने घेतली होती. तीच भूमिका आता बांगलादेश सोबतही घ्यायला हवी. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अनन्वित अत्याचारांना विसरून बांगलादेशी खेळाडूंना भारत भूमीवर ‘रेड कार्पेट’ अंथरणे, आम्ही कदापि सहन करणार नाही. हीच भूमिका आयपीएल मधील सर्व संघमालकांनी घ्यायला हवी होती; मात्र ‘बीसीसीआय’ च्या निर्णयानंतर बांगलादेशी खेळाडू मुस्तफीजुर रहमानला वगळण्यात आले. ‘हिंसा आणि खेळ हे देखील एका वेळी करता येणार नाही’, असा संदेश भारत सरकारने बांगलादेशला द्यायला हवा. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या एकाही खेळाडूला भारतभूमीवर खेळू देणे, हा हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे होईल, त्यामुळे या देशांच्या खेळाडूंना भारतात खेळवण्यावर पूर्णपणे बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. भारत भूमीवर बांगलादेशी आणि पाकिस्तानी खेळाडूला खेळण्यास अनुमती देऊ नये, अशा मागणीचे निवेदन समितीने पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षांना पाठवले आहे. समितीने काही दिवसापूर्वीच बांगलादेशी खेळाडू मुस्तफीजुर रहमान याला कोलकाता नाइट रायडर्स संघातून वगळण्याची मागणी केली होती. यावर आज बीसीसीआयने भूमिका घेतली. बीसीसीआयच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो; मात्र हीच भूमिका सर्वप्रथम ‘कोलकाता नाइट रायडर्स’च्या संघमालकाने घ्यायला हवी होती; मात्र शाहरूख खाने अशी भूमिका स्वतःहून घेतली नाही. त्याला बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांपेक्षा स्वतःचा संघ, व्यवसाय आणि त्यातून होणारी कमाई महत्त्वाचे वाटते, हे निंदनीय आहे. बांगलादेशी खेळाडूंना प्रोत्साहन देणे म्हणजे त्या बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसेला अप्रत्यक्ष पाठबळ देणेच होय. त्यामुळे आम्ही शाहरूख खानचा जाहीर निषेध करतो, तसेच त्याने देशाची माफी मागावी, अशी मागणी करतो.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, याशिवाय अनधिकृत बांगलादेशी घुसखोरांमुळे भारतातील कायदा सुव्यवस्था बिघडणे, मानवीतस्करी, अमली पदार्थांचे रॅकेट, वेश्याव्यवसाय आदी गुन्हेगारी क्षेत्रांतही सुळसुळाट झाला आहे. तरी बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशात हाकलून लावावे, असेही समितीने म्हटले आहे.



