*चिंचपाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चिंचपाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा*
*चिंचपाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित, वनवासी विद्यालय व एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा. येथे 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देवी शारदेच्या व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व स्वागत गीताने करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद चिंचोले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुवर्णा चौधरी यांनी केले व प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती पुनम चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचे वर्णन करीत सुंदर विचार मांडलेत. श्रीमती शैलेजा कापडिया यांनी आपल्या मनोगतात स्त्रीला स्वातंत्र्य व शिक्षण मिळवून देण्यासाठी समाजाचा विरोध स्वीकारून सावित्रीबाईंनी केलेल्या महान कार्याचे वर्णन केले.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद चिंचोले सरांनी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या, मनोगत व्यक्त करणाऱ्या, सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत, सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकीत आपले विचार मांडलेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्वेता वसावे व रोहिणी पाडवी यांनी केले तर आभार कु. प्रांजल वसावे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.



