*बालिका दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जिल्हा परिषद शाळा कार्ली येथे विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बालिका दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जिल्हा परिषद शाळा कार्ली येथे विनम्र अभिवादन*
*बालिका दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जिल्हा परिषद शाळा कार्ली येथे विनम्र अभिवादन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद शाळा कार्ली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिमा पूजनाच्या झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सरपंच सौ पूनम पाटील यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार, सौ सरस्वती भिल व सौ दिव्या भिल उपस्थित होते.
बालिका दिनानिमित्त माता पालक गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच सावित्रीच्या वेशा मध्ये शाळेच्या प्रांगणात अनेक विद्यार्थिनींनी प्रवेश करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थिनींनी सावित्री माईंना अभिवादन करताना सावित्रीच्या ओवी सादर केल्या. तर अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षण विषयक कार्याच्या बाबतीत भाषण केले. माता पालक गटातील मातांची भूमिका याविषयी शिक्षिका श्रीमती ज्योती वाघ, व श्रीमती हेमलाता गावित यांनी मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापक राकेश आव्हाड यांनी सावित्रीबाईं फुलेंचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. अध्यक्षीय भाषणात सरपंच सौ पूनम पाटील यांनी सांगितले की जर सावित्रीबाई नसत्या तर आज या ठिकाणी मी तुमच्यासमोर उभी राहू शकली नसती. स्त्रियांच्या प्रगतीचा पाया सावित्रीबाई फुले यांनीच घातला. सावित्रीच्या वेशात विद्यार्थिनी जानवी कोळी, नम्रता पाटील, निकिता पाटील, निकिता कोळी, हिमांशी पाटील, मिराबाई ठेलारी, संगीता ठेलारी, उन्नती महाले, गणेश्री भील, हंसनंदनी भील, यांनी सावित्रीच्या ओवी गायन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक ज्ञानेश्वर वानखेडे यांनी परिश्रम घेतले.



