*अक्कलकुवा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा*
*अक्कलकुवा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहक चळवळीचे जनक स्वर्गीय बिंदू माधव जोशी लिखित अष्टाध्यायीचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार विनायक घुमरे ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संजय शर्मा तालुकाध्यक्ष जीवनलाल भन्साली पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल जावरे, पुरवठा निरीक्षक नीलिमा काळमेघ, या प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संजय शर्मा यांनी ग्राहकांचे हक्क अधिकार तसेच ग्राहक चळवळीची सविस्तर विवेचन केले तहसीलदार विनायक घुमरे यांनी ग्राहकांचे हक्क अधिकार तसेच ग्राहक कायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले ग्राहक प्रवासी महासंघाचे राजाराम राणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन पंडित भामरे यांनी तर आभार पुरवठा निरीक्षक नीलिमा काळामध्ये यांनी मानले. यावेळी तालुका ग्राहक मंचाचे सचिव एड. राजेंद्र जैन, कोषाध्यक्ष प्रेमचंद जैन, प्रा. आर. ओ. मगरे, तालुका प्रसिद्धीप्रमुख शुभम भंसाली, रवींद्र चौधरी, कृष्णा पंजराळे आदींसह ग्राहक व रेशन दुकानदार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक चळवळीचे जनक बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन प्रा आर. ओ. मगरे यांनी सादर ग्राहक गीताने करण्यात आली.



