*नंदुरबार जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मंगेश चौधरी यांच्या विद्यापीठातर्फे सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मंगेश चौधरी यांच्या विद्यापीठातर्फे सत्कार*
*नंदुरबार जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मंगेश चौधरी यांच्या विद्यापीठातर्फे सत्कार*
नंदूरबार(प्रतिनिधी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे 30 व 31 डिसेंबर रोजी आविष्कार या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन संमेलनाचे विद्यापीठ स्तरीय आयोजन करण्यात आले होते. यात उत्तर महाराष्ट्रातून जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित आदिवासी अकादमी, नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या संमेलनात अविष्कार–फेज 1 (जिल्हास्तरीय) स्पर्धेतून आदिवासी अकादमी नंदुरबारच्या सूर्यवंशी माधुरी, राठोड प्रियंका, चौधरी मंगेश व मालचे अजय या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, शेतीपूरक व्यवसाय तसेच लुप्तप्राय वनऔषधी व पारंपरिक उपचारज्ञान या विषयांवर प्रभावी संशोधन पोस्टर व मॉडेल सादरीकरण करून परीक्षकांची दाद मिळवली.
विद्यापीठ स्तरावर उत्कृष्ट सादरीकरण करत चौधरी मंगेश व मालचे अजय यांनी संयुक्त पणे मांडलेल्या संशोधन प्रकल्पाने विशेष ठसा उमटवला. मानवविद्या, भाषा व कला या शाखेतून पदवुत्तर गटातून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या संशोधनाची दखल घेत त्यांची परभणी कृषी विद्यापीठ येथे जानेवारी 28-31 2026 दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय अविष्कार सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या संशोधनासाठी आदिवासी अकादमीचे मा. संचालक डॉ. किशोर पवार व प्रा स्मिता देशमूख यांचे मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले.
विद्यापीठाचे कुलगुरू व्ही एल माहेश्वरी, प्रकुलगुरू एस टी इंगळे, कुलसचिव विनोद पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. ही कामगिरी आदिवासी अकादमीसाठी अभिमानास्पद असून विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेचे द्योतक आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मंगेश चौधरी आदिवासी अकादमी परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



