*जी.टी.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेषहिवाळी शिबिर उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेषहिवाळी शिबिर उत्साहात संपन्न*
*जी.टी.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेषहिवाळी शिबिर उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे विशेष हिवाळी शिबिर आदिवासी अकादमी, टोकर तलाव शिवार, नंदुरबार येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये सेवा, शिस्त व सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजविण्यासाठी विविध उपक्रमांसह अनेक मान्यवरांची मार्गदर्शक व प्रेरणादायी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, संस्कार, मूल्ये व शिस्त ही आयुष्यभर सोबत राहणारी संपत्ती आहे. शिबिरातून मिळणारा जीवनानुभव आणि वेळेचा सदुपयोग हाच या उपक्रमाचा खरा फलित आहे. हे अनुभव सदैव जपावेत, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.
प्रमुख अतिथी आदिवासी अकादमीचे संचालक डॉ. किशोर पवार यांनी विशेष हिवाळी शिबिराचे महत्त्व विशद करत स्वयंसेवकांना आपले अनुभव सांगितले. तसेच शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. एक चांगला स्वयंसेवक हा देशाच्या विकासासाठी हातभार लावणारा घटक बनतो. असे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांनी राष्ट्रीय सेवा योजना व विशेष हिवाळी शिबिराचे कार्य, उद्दिष्टे आणि स्वयंसेवकांची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले. या शिबिरातून आपण भावी आयुष्यासाठी एक चांगल्या आठवणी घेऊन जात आहात असे प्रतिपादन केले.
उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील यांनी विविध उदाहरणांद्वारे शिबिराचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात प्रा. अंकुश रघुवंशी यांनी शिबिराचे यश हे स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते, आणि हे शिबिर स्वयंसेवकांनी यशस्वीपणे पूर्ण करून दाखवले असल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. जे. साक्रीकर यांनी केले. विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज शेवाळे यांनी केले होते. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन प्रा. एस. एस. दुतोंडे यांनी केले. आदिवासी अकादमीची चे प्रा. स्मिता देशमुख, प्रा. अर्चना पाटील, प्रा. चौरे यांचे सहकार्य लाभले. शिबिर व समारोप कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पी. सी. भील, प्रा. सी. के. गिरासे, डॉ.डी.डी.गावीत, प्रा. एच. यु. गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या विशेष हिवाळी शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सेवाभाव, नेतृत्वगुण व शिस्तीचे संस्कार अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.



