*वीर बालदिन निमित्ताने 2000 विद्यार्थ्यांनी बालविवाह न करणेची घेतली शपथ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि युवकमित्र परिवार संस्था कोठली यांचा उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वीर बालदिन निमित्ताने 2000 विद्यार्थ्यांनी बालविवाह न करणेची घेतली शपथ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि युवकमित्र परिवार संस्था कोठली यांचा उपक्रम*
*वीर बालदिन निमित्ताने 2000 विद्यार्थ्यांनी बालविवाह न करणेची घेतली शपथ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि युवकमित्र परिवार संस्था कोठली यांचा उपक्रम*
शहादा(प्रतिनिधी):-वीर बालदिवस निमित्त जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नंदुरबार आणि युवकमित्र परिवार कोठली तालुका शहादा या संस्थेमार्फत संपूर्ण जिल्हाभरातील 20 पेक्षा अधिक शाळांमध्ये तब्बल 2000 विद्यार्थ्यांनी बालविवाह न करणेची सामूहिक शपथ घेऊन वीर बालदिवस साजरा करत बालविवाहमुक्त भारत अभियानात सहभाग नोंदवला आहे. महिला व बालविकास आयुक्तालय पुणे मार्फत राज्यातील शाळांमध्ये विविध संस्थामध्ये बालविवाहमुक्त भारत कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम, कायद्यातील तरतुदी तसेच शिक्षा, बालविवाहामुळे होणारे शारिरीक मानसिक दुष्परिणाम याबद्दल माहिती देणे, बालविवाह न करणेची सामूहिक शपथ घेणे अशा कार्यक्रमाचे आयोजन करणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार शहादा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय कळंबू, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोंढावळ, श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय फेस, अनुबाई सोनवणे आदिवासी आश्रमशाळा नवागाव, माध्यमिक विद्यालय दामळदा, माध्यमिक विद्यालय उधळोड, किशोर महाजन माध्यमिक विद्यालय सोनवल तसेच नंदुरबार तालुक्यातील भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालय नंदुरबार, माध्यमिक विद्यालय दुधाळे नवापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय शेगवे, माध्यमिक विद्यालय मोग्राणी, तळोदा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय बुधावल, धडगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यालय निगदी, अक्कलकुवा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा मांडवा या शाळांमधील विद्यार्थ्यांनी बालविवाह न करणेबाबत सामूहिक शपथ घेऊन बालविवाहमुक्त नंदुरबार जिल्हा असा नारा दिला. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय पाटील, परिविक्षा अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली युवकमित्र परिवार कोठली संचलीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सामाजिक कार्यकर्त्या पूनम पवार, अश्विनी जाधव तसेच डेटा एन्ट्री ऑपरेटर उमेश माळी यांनी यशस्वी पार पाडले. तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी युवकमित्र परिवार संस्थेच्या अध्यक्षा श्वेता माळी, सचिव कविताबाई माळी यांचे सहकार्य लाभले.



