*जिल्हा परिषद शाळा हरणखुरी व भुजगांव येथे बालिका दिवस उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा परिषद शाळा हरणखुरी व भुजगांव येथे बालिका दिवस उत्साहात साजरा*
*जिल्हा परिषद शाळा हरणखुरी व भुजगांव येथे बालिका दिवस उत्साहात साजरा*
धडगाव(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणखुरी व भुजगांव येथे बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील मुलींनी थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून सादर केलेले प्रेरणादायी रूप. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी जे.एस. वळवी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच अर्जुन पावरा यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मुलींना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता व बालिकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. कार्यक्रमात बालिकांनी विविध उपक्रमांतून आपले विचार व्यक्त केले. बालिका दिन साजरा करण्यामागील उद्देश समाजात मुलींच्या शिक्षणाविषयी जनजागृती करणे हा असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. उपसरपंच कविता पावरा व ग्रामपंचायत सभासद आणि कर्मचारी यांचा सहभाग राहिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले. उपस्थित पालक व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



