*सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी येथे तंबाखूमुक्त शाळा प्रशिक्षण संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी येथे तंबाखूमुक्त शाळा प्रशिक्षण संपन्न*
*सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी येथे तंबाखूमुक्त शाळा प्रशिक्षण संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार, सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त आरोग्यदायी शाळा कार्यक्रम अंतर्गत नवापूर तालुकास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा कै. हेमलता वळवी प्राथमिक विद्यालय, विसरवाडी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये जीवनावश्यक मूल्ये रुजावीत, तंबाखूचे दुष्परिणाम समजावेत तसेच स्वच्छता व पोषणविषयक सवयी अंगीकारल्या जाव्यात, या उद्देशाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शासन निर्णय व अधिकृत संदर्भ ही कार्यशाळा शिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांच्या परवानगी पत्रानुसार तसेच तंबाखूमुक्त शाळांचे नऊ निकष पूर्ण करण्याबाबतच्या शासन निर्णयांनुसार आयोजित करण्यात आली. मान्यवरांचे मार्गदर्शन
सदर कार्यशाळा जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे प्राचार्य संजय कांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, वंदना वळवी व उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच रमेश देसले, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती नवापूर यांच्या सूचनेनुसार प्रत्येक शाळेतून एक शिक्षक उपस्थित राहील याची दक्षता घेण्यात आली व एकही शाळा बंद राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. तंबाखूमुक्त शाळा उज्ज्वल भविष्य, सलाम मुंबई फाउंडेशनतर्फे युवकांना सुरक्षित व आरोग्यदायी भविष्य घडविण्याच्या उद्देशाने तंबाखूमुक्त वातावरण निर्मितीसाठी सातत्याने कार्य करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम, स्वच्छतेच्या सवयी व पोषणविषयक सवयी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कायदेशीर जनजागृती
सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध, तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी, 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू विक्रीवर प्रतिबंध तसेच शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्रीस मनाई याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तंबाखू सोडण्याचे आरोग्यदायी फायदे तंबाखू सोडल्यास शरीरावर होणारे तात्काळ व दीर्घकालीन सकारात्मक परिणाम स्पष्ट करण्यात आले. यामध्ये हृदयविकाराचा धोका कमी होणे, श्वसनक्षमता वाढणे, शारीरिक कार्यक्षमता सुधारणा, आत्मविश्वासात वाढ तसेच आयुर्मानात वाढ होणे यांचा समावेश होता.
उपस्थिती व समारोप
सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक विक्रम इंगवले व दीप्तीशा शिंदे यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. तज्ञ सुलभक गोपाल गावित, संजय देवरे, नितेश वळवी व प्रकाश भिसे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
नवापूर तालुक्यातील 19 केंद्रांमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेरणादायी वातावरणात प्रशिक्षण संपन्न झाले. समारोप प्रसंगी सर्व शिक्षक बांधवांनी तंबाखूमुक्त शाळा अभियानासाठी प्रतिज्ञा घेतली. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख निंबा पाकळे, विसरवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख आनंदा पवार, निमदर्डा केंद्राचे केंद्रप्रमुख बाबुराव वसावे, कडवान केंद्राचे केंद्रप्रमुख अमृत वळवी, करंजी केंद्राचे केंद्रप्रमुख गोपाल मावची आदी उपस्थित होते. आजची तंबाखूमुक्त शाळा म्हणजे उद्याचा व्यसनमुक्त समाज.



