*उत्कर्ष कुणबी संस्थेच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त दख्खन फोंडेवाडी येथे संस्थेने लावल्या सोलार लाईट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- ठळक बातम्या
*उत्कर्ष कुणबी संस्थेच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त दख्खन फोंडेवाडी येथे संस्थेने लावल्या सोलार लाईट*
*उत्कर्ष कुणबी संस्थेच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त दख्खन फोंडेवाडी येथे संस्थेने लावल्या सोलार लाईट*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊनही रस्ता व वीजे पासून वंचित असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत व आंबा घाटाच्या पायथ्याशी अती दुर्गम भागात वसलेल्या दख्खन गावातील सात कुटुंबे धनगर वस्ती असलेल्या फोंडेवाडी येथे उत्कर्ष कुणबी संस्था (रजि.) साखरपा दाभोळे पंचक्रोशी या संस्थेच्या वतीने 28 डिसेंबर 2025 रोजी 5 सोलार लाईट लावण्यात आल्या. आणि अनेक वर्षे अंधारात चाचपडणाऱ्या दुर्लक्षित ग्रामस्थांचे जीवन प्रकाशमय केले. कित्येक वेळा लोकप्रतिनिधी व शासन दरबारी वीज मिळावी म्हणून विनंती वजा अर्ज करुनही या ग्रामस्थांची मागणी पूर्ण होवू शकली नाही. याची दखल घेऊन उत्कर्ष कुणबी संस्थेने हे काम पूर्ण केले. या वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता तर सोडा धड पायवाट सुध्दा नाही. या सोलार लाईट साठी लागणारे लोखंडी पोल, वाळू, सिमे़ट, खडी इत्यादी सामान संस्थेच्या पदाधिकारी यांनी स्वतः खांद्यावर, डोक्यावर घेऊन त्या खाचखळग्यातून, काट्याकुट्यातून दोन ते अडीच किलोमीटर चालत तेथपर्यंत नेले. संस्थेचे अध्यक्ष दयानंद चिंचवलकर, कार्याध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे, उपाध्यक्ष उदय बाईत, सचिव महेंद्र मोरे, खजिनदार विजय तळेकर, सहसचिव मनोहर अडबल, सहखजिनदार शांताराम जायगडे, सल्लागार रमेश पितळे, दत्ताराम निवळे तसेच स्थानिक कार्यकर्ते विलास कांगणे (सरपंच देवडे), आप्पा अडबल, गणेश कटम यांचे सहकार्य लाभले तसेच यावेळी ग्रामस्थ संजय गुरव, पोलिस पाटील रविंद्र फोंडे व सुनील माईन यांचे सुध्दा सहकार्य लाभले.



