*धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा निर्णय रखडलेला; 21 जानेवारीला आझाद मैदानावर निर्णय आंदोलन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा निर्णय रखडलेला; 21 जानेवारीला आझाद मैदानावर निर्णय आंदोलन*
*धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा निर्णय रखडलेला; 21 जानेवारीला आझाद मैदानावर निर्णय आंदोलन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी मान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी जाहीरपणे सांगितले होते. सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धनगर आरक्षणाला मान्यता दिली होती मात्र सत्तेत येऊन बराच कालावधी उलटून गेला तरी धनगर समाजाच्या आरक्षणावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, यामुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करत आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 21 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर निर्णायक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर आरक्षणाचे प्रमुख नेते दीपक बोराडे यांनी दिले. धनगर आरक्षणाचे प्रमुख नेते दीपक बोराडे हे संपूर्ण महाराष्ट्र दौरा करीत आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांशी व समाज बांधवांची बैठक घेण्यात आली व आंदोलन संदर्भात चर्चा करण्यात आली. प्रारंभी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. या बैठकीला धनगर समाज महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा बबन बागुल, पुंडलिक मोरे, बारकू शिरोळे, देवा मानवर,दत्तू सूळ, हांडु धनगर, नितीन ठाकरे, सतिष काटके, यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.
या आंदोलनाच्या तयारीसाठी राज्यभर दौरे करण्यात येत असून, विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन धनगर समाजाच्या बांधवांचा पाठिंबा मिळवण्यात येत आहे. सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत म्हणून 21 जानेवारीला निर्णायक लढा देण्यात येईल.आणि हा लढा निर्णायक राहणार आहे. धनगर समाजाची ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेता एसटी आरक्षणाची मागणी रास्त असल्याने सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यावा असे प्रमुख आंदोलक दीपक बोराडे यांनी बोलतांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सतिष काटके यांनी केले.



