*हिंदू धर्मजागृती सभेचा नियोजन बैठकीत सभेचे फलकचे अनावरण: सभा यशस्वी करण्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या निर्धार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिंदू धर्मजागृती सभेचा नियोजन बैठकीत सभेचे फलकचे अनावरण: सभा यशस्वी करण्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या निर्धार*
*हिंदू धर्मजागृती सभेचा नियोजन बैठकीत सभेचे फलकचे अनावरण: सभा यशस्वी करण्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या निर्धार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिंदु सेवा सहाय्य समिती आयोजित विराट हिंदु धर्मजागृती सभा 18 जानेवारी रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता श्रॉफ हायस्कूल मैदानावर आयोजित केली आहे. या सभेचे व्यापक नियोजन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ यांची बैठक द्वारकाधिश मंदिर सभागृह येथे आयोजित केली होती. या बैठकीत हिंदुत्वनिष्ठ यांचा हस्ते हिंदु धर्मजागृती सभा फलकाचे अनावरण करण्यात आले. बैठकीत सभा अभूतपूर्व यशस्वी करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठ यांनी केला. नंदुरबार येथे होणाऱ्या या हिंदू धर्मजागृती सभेचे प्रमुख वक्ते म्हणून कालीपुत्र कालीचरण महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सभेचा पूर्वनियोजन बैठकीत सुरुवातीला पुरोहित संघांचे अध्यक्ष प्रमोद जोशी गुरुजी यांचा हस्ते सभेचा भिंतीपत्रकांचे वैदिक मंत्र घोषाने विधिवत पूजन करण्यात आले. विघ्नहर्ता श्री गणेशाचा श्लोकाने बैठकीला सुरुवात करण्यात आली. बैठकीला उपस्थित हिंदुत्ववादी यांनी सभा यशस्वी होण्यासाठी विविध मुद्दे उपस्थित केले. त्यात शहर आणि ग्रामीण भागात भिंतीवर, रिक्षावर पोस्टर्स लावणे, घरोघरी निमंत्रण पत्रिका पाठविणे, ग्रामीण आणि नंदुरबार शहरात विविध भागात बैठका घेणे, चौकाचौकात बॅनर्स लावणे, सोशल मिडियावर प्रभावी प्रचार प्रसार करण्याचा निर्धार उपस्थित हिंदुत्वनिष्ठ यांनी केला. यावेळी सभेचा पोस्टर्सचे अनावरण उपस्थित पुरोहित संघाचे सदस्य, मान्यवर, विविध जाती समाजाचे अध्यक्ष, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, व्यायाम शाळा, गणेश मंडळाचे प्रतिनिधी यांचा शुभहस्ते करण्यात आले. बैठकीला मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी उपस्थित होते. बैठकीचे सूत्र हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील, राजू चौधरी यांनी मांडले. बैठक यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.



