*वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे किसान गोष्टी कार्यक्रम येथे संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे किसान गोष्टी कार्यक्रम येथे संपन्न*
*वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे किसान गोष्टी कार्यक्रम येथे संपन्न* नंदूरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा अंतर्गत"किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम" प्रकल्प संचालक आत्मा दिपक पटेल तालुका कृषी अधिकारी के. एस. वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील विषय विशेषज्ञ उमेश पाटील, कृषी महाविद्यालयाचे कुणाल पाटील, हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लालसिंग वसावे, गणेश वसावे अध्यक्षस्थानी मंडळ कृषी अधिकारी एस बी बागुल व उप कृषी अधिकारी अशोक महिरे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव सहाय्यक कृषि अधिकारी वाय.एस मिस्त्री उपस्थित होते.
मंडळ कृषी अधिकारी एस.बी. बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये पीक स्पर्धा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना महा विस्तार AI ऍप महा कृषि Maha DBT याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी शास्त्रज्ञ उमेश पाटील यांनी कार्यक्रमांमध्ये पिकाच्या उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य कसे महत्वाचे आहे व त्यावर उपायोजना कश्या पद्धतीने करता येते यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच हरभरा व गहू पिकातील उत्पादन लागवड तंत्रज्ञान यामध्ये सुधारित वाणाच्या वापर, बिजप्रक्रिया, खत व्यवस्थापन व धान्य पिकांची प्रतवारी कश्या प्रकारे करावी जेणे करून गुणवत्ता पूर्वक उत्पादन व बाजारभाव चांगला मिळतो यादृष्टीने गहू व हरभरा पिकातील पीक उत्पादनासाठी पंचसूत्री तंत्रज्ञानाच्या अवलंब केल्यास पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते तसेच पिक उत्पादन सोबतच शेतीपूरक व्यवसाय हा महत्त्वपूर्ण असतो यावर त्यांनी मार्गदशन केले. कुणाल पाटील यांनी हरभरा पिकावरील एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन व अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकरी या कार्यक्रमात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांनी वेळोवेळी येणाऱ्या अडचणी मांडून शास्त्रज्ञांनी त्यांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक कृषी अधिकारी योगेश मिस्त्री व आभार प्रदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रविंद्र बच्छाव यांनी केले. सहायक कृषी अधिकारी दीपिका ठाकरे आणि मंजुळा पवार, कृष्णा पाटिल,पंकज देसले कृषि मित्र नितीन पाटिल मधुकर पाटिल जितेंद्र पाटिल, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.



