*लग्न समारंभात वेषभूषा करुन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांची संयुक्त कामगिरी, 4 आरोपींकडून एकुण 2 लाख 20 हजार 830 रुपये किमतीचे सोन्याचे दा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लग्न समारंभात वेषभूषा करुन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांची संयुक्त कामगिरी, 4 आरोपींकडून एकुण 2 लाख 20 हजार 830 रुपये किमतीचे सोन्याचे दा
*लग्न समारंभात वेषभूषा करुन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांची संयुक्त कामगिरी, 4 आरोपींकडून एकुण 2 लाख 20 हजार 830 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत*
नंदूरबार(प्रतिनिधी):-दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी नंदुरबार शहरातील हॉटेल पीजी सन्स येथील लग्न समारंभात काही अज्ञात इसमांनी प्रवेश करुन लग्नात आलेल्या वऱ्हाडीप्रमाणे वेशभूषा करत लग्नातुन दागिने व रोख रक्कम तसेच मोबाईल असलेली बॅग चोरुन नेले म्हणुन नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे फिर्यादी पारसनाथ जयस्वाल यांचे फिर्यादीवरुन गु.र.नं. 680/2025 भा. न्या. संहिता कलम 303(2) प्रमाणे अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असतांना गोपनिय माहिती व सीसीटीव्ही फुटेज व इतर तथ्यांच्या आधारे सदरची चोरी ही मध्यप्रदेश राज्यातील काही सवयीचे गुन्हेगारांनी केले असल्याचे निष्पन्न झाले. त्याअन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी पथक तयार करुन आरोपींचा शोध घेणेकामी रवाना केले. पथकांनी नमुद गुन्हयातील आरोपींचा शोध घेतला असता त्यामध्ये आरोपी बादल कृष्णा सिसोदिया, वय- 24 वर्षे रा. गुलखेडी ता.पचोर जि. रायगड मध्यप्रदेश, काला ऊर्फ हतिक महेश सिसोदीया वय 22 वर्षे रा.कडीया ता. पाचोर जि. रायगड मध्यप्रदेश, दिपक दिलीप सिसोदीया वय 29 वर्षे रा. कडीया ता. पाचोर जि. रायगड मध्यप्रदेश, जसवंत मनीलाल सिसादिया वय 27 वर्षे रा. गुलखेडी ता. पचोर जि.रायगड मध्यप्रदेश असे मिळुन आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी नमुद गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडुन एकुण 2 लाख 20 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल त्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे हस्तगत करण्यात पोलीस पथकांना यश मिळाले आहे.
सदर सवयीचे आरोपी हे विविध राज्यात फिरुन लग्न समारंभ व बँकांचे बाहेर तसेच सराफ बाजारात उभे राहून चोरी करण्याचे उद्देशाने नागरिकांवर लक्ष ठेऊन असतात. तरी नागरिकांनी कुठेही जातांना आपले सोबत असलेली मौल्यवान वस्तु सांभाळुन ठेवावी तसेच आपले आजुबाजूला काही संशयास्पद बाब दिसल्यास त्याबाबत तात्काळ जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास कळवावे, असे आवाहन यावेळी जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, पोउपनि मुकेश पवार, शहर पोलीस ठाण्याचे पोउपनि छगन चव्हाण, पोहेकों/मोहन ढमढेरे, दिपक बुनकर, पोकों/अभय राजपुत, किरण मोरे, प्रविण वसावे, अनिल वसावे, विदयेश्वर बिरारी यांनी केली आहे.



