*जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियानांतर्गत व्यापक लोकसहभाग व विकासकामे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियानांतर्गत व्यापक लोकसहभाग व विकासकामे*
*जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियानांतर्गत व्यापक लोकसहभाग व विकासकामे*
नंदूरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियान काळात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व सर्वांगीण विकासकामे करण्यात आली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 126 गावांमध्ये एकूण 293 वनराई बंधारे बांधण्यात आले असून, यामुळे पाणी साठवण क्षमता वाढून शेतीला मोठा लाभ होत आहे. तसेच 64 गावांमध्ये 745 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातही मोठी प्रगती साधण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात एकूण 1,70,800 आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने 231 गावांमध्ये 2,30,641 वृक्ष लागवड करून पर्यावरणासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे.
शिक्षण व बालविकास क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी शाळा व अंगणवाड्या डिजिटल करण्यात येऊन 132 शाळा व अंगणवाडी मध्ये 651 'बोलक्या भिंती' तयार करण्यात आल्या आहेत. तसेच पारदर्शक व आधुनिक प्रशासनासाठी 153 ग्रामपंचायतींनी स्वतःची वेबसाईट विकसित केली असून त्यामधे ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामाची माहिती व आवश्यक माहिती प्रसिद्धी करण्यात येत आहे. ग्रामीण रोजगार व जलसंधारणाच्या दृष्टीने मनरेगा अंतर्गत 220 गावांमध्ये 1192 सिंचन विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत. सदर अभियान कालावधीत एकूण 132 ग्रामपंचायत यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे
मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा व विकासाची नवी दिशा निश्चित करून या अभियानामुळे ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल असे. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल (भा प्र से) व उप मुख्यकार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसूरकर (ग्राप) जि प नंदुरबार यांनी आवाहन केले.



