*नंदुरबार येथील पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हक्क शेतकरी संघटनेतर्फे, सुजलोन कंपनीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हक्क शेतकरी संघटनेतर्फे, सुजलोन कंपनीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन*
*नंदुरबार येथील पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हक्क शेतकरी संघटनेतर्फे, सुजलोन कंपनीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-सुजलोन कंपनी विरोधात समितीचे आंदोलन तूर्तास स्थगित, लवकर न्याय द्या नाहीतर निर्णायक आंदोलन करण्याचा पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीचा इशारा.
तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुजलोन ग्लोबल सर्विस लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांची संमती न घेता, विद्युत पोल, रस्ता, पिंजरा, तार टाकून अतिक्रमण केले आहे. सदर जमिनीची संपूर्ण चौकशी करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी तहसीलदार यांच्या कडून करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे. या निकालात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले होते. परंतु हा निकाल लागून सहा महिने झाले तरी अद्याप पर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अदा केलेली नाही. तहसीलदाराच्या आदेशाप्रमाणे सुजलोन कंपनीवर नुकसानभरपाई देणे बंधनकारक असताना कंपनी हेतू पुरस्कर नुकसान भरपाई देणे टाळत आहे. त्यासाठी दिनांक 30 डिसेंबर रोजी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार होते परंतु शासनाने परवानगी नाकारल्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. परंतु शासन व पवन ऊर्जा कंपनीने लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर निर्णायक आंदोलन छेडण्यात येईल व यास सर्वस्व शासन व पवन ऊर्जा कंपनी जवाबदार राहील. यासंदर्भात आज प्रांत अधिकारी अंजली शर्मा यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी अंजली शर्मा यांनी लवकर न्याय देण्याचे आश्वासन दिले. यावेळी समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे, समितीचे सचिव भिला भिल व शेतकरी उपस्थित होते.



