*दराफाटा ते म्हसावद रस्त्यावर खड्डेच खड्डे,खड्डे बुजवण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दराफाटा ते म्हसावद रस्त्यावर खड्डेच खड्डे,खड्डे बुजवण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
*दराफाटा ते म्हसावद रस्त्यावर खड्डेच खड्डे,खड्डे बुजवण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
शहादा(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील दरा फाटा ते म्हसावद पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरूस्त करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहादा ते धडगांव या मुख्य रस्त्यावरील दरा फाटा ते म्हसावद या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे. या रस्त्याचे काम करण्यात यावे, म्हणून बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. त्यानंतर रस्ता दुरूस्त करण्यात आला होता. परंतू पुन्हा रस्त्यावर मोठ -मोठे खड्डे पडले आहेत. सदर रस्ता हा धडगांव ते शहादा या दोन तालुक्यांना जोडणारा एकमेव मार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरून कायमच्याच एस टी महामंडळाच्या बस ये जा करतात. ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था आहे. रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे. रस्त्यावर 1 फूट पेक्षा अधिक खोल खड्डे झाले आहेत. या रस्त्यावरून गरोदर महिला, वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून तातडीने या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरूस्त करण्यात यावा, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.



