*साहित्यरत्न प्रकाशन संस्था संचालित एकदंत साहित्य मंच आयोजित कवी संमेलन मोठ्या जल्लोषात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साहित्यरत्न प्रकाशन संस्था संचालित एकदंत साहित्य मंच आयोजित कवी संमेलन मोठ्या जल्लोषात संपन्न*
*साहित्यरत्न प्रकाशन संस्था संचालित एकदंत साहित्य मंच आयोजित कवी संमेलन मोठ्या जल्लोषात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-पुणे येथे साहित्यरत्न प्रकाशन संस्था संचालित एकदंत साहित्य मंच आयोजित प्रातिनिधिक काव्य संग्रहाचे प्रकाशन आणि राज्य स्तरीय पहिले काव्य संमेलन पुणे येथे रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था,पंतसचिव कार्यालय, सदाशिव पेठ पुणे 30 या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, संस्थेचे प्रमुख आयोजक अँड. उमाकांत आदमाने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व सत्कार करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध कवी म.भा. चव्हाण, प्रसिद्ध कवी बाबा ठाकूर, कवयित्री शुभांगी शिंदे प्रमुख पाहुणे नयना गुरव कविता काळे, आणि संस्थेचे अध्यक्ष सुमित हजारे, अँड. उमाकात आदमाने आदि उपस्थित होते. यावेळी नयना गुरव मार्गदर्शन करताना म्हणाल्या की," कविता ही कविच्या अंतर्गत मनात असते. कविला इतरांच्या वेदना पिडा जाणवतात, संवेदनशील मनातून साहित्य निर्माण होते, कविता ही समाजाचा आरसा असतो, साहित्यातून सर्जनशील लिखाण होत असते, साहित्यिक हेच खरे संस्कृती चे जतन करतात. कळा लागल्याशिवाय कविता जन्माला येत नाही,"कार्यक्रमाचे उद्घाटक बाबा ठाकूर मार्गदर्शन करताना म्हणाले की," कवी मध्ये मी भेदभाव कधीच करत नाही, मी स्वतः वर प्रेम करणारा कवी आहे. कवि म्हणून अभिमान बाळगा, अहंकार नको," या वेळी चादर ही सामाजिक विषयांवर कविता सादर केली. यावेळी वाघीण (कथा संग्रह), झरा( काव्य संग्रह) आणि एकदंत हा प्रातिनिधिक काव्य संग्रह या तीन पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कवयित्री शुभांगी शिंदे यांनी सांगितले की", कविता म्हणजे सुंदर नक्षी असते, कविता ओसाड माळरानावर बाग फुलविते. कविता म्हणजे संघर्षाचा प्रदीर्घ श्वास. " तर कवयित्री कविता काळे यांनी गजल सादर केली. कार्यक्रम अध्यक्ष म. भा.चव्हाण यांनी आपल्या भाषणात अनेक वेचक, वेधक, कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली, सूत्र संचालन उमाकांत आदमाने यांनी केले. सुमित हजारे यांनी प्रास्ताविक केले, या वेळी भारत कवितके, नमाई शेख, प्राची वैद्य, ऍड. रोहिणी जाधव, अनंत जाधव,गुरव, श्रीराम घडे, दशरथ धायगुडे, जोरे व इतर कवी कवयित्री आपल्या कविता सादर केल्या, सहभागी कवी कवयित्रीना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.



